जत| पुन्हा एकदा महाश्रमदान, राज्यातील क्रंमाकसाठी आंवढी, मायथळ,मोकाशवाडी,कुलाळवाडी,देवनाळमध्ये आयोजन | www.sankettimes.com

0
3

जत,प्रतिनिधी : पानी फाउंडेशन वाटर कप स्पर्धा 2018 मध्ये आपल्या जत तालुक्याने खूप चांगले काम केले आहे. त्याची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंवढी, बागलवाडी येथे भेट दिली.त्या पार्श्वभुमीवर जत तालुक्यातील वॉटर कँप स्पर्धा चुरसीची झाली आहे.श्रमदानाचे आता फक्त तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. जतची 5 गावे  राज्यातील क्रंमाकसाठी स्पर्धेत आहेत.उर्वरित काम पुर्ण व्हावे यासाठी आज ता.20 मे ला देवनाळ, आवंढी, मायथळ,मोकाशिवाडी, व कुलाळवाडी या गावांमध्ये महाश्रमदान आयोजित केले आहे. हि पाच गावे  राज्यस्तरीय बक्षिसास पात्र होण्यासाठी या गावांना आपण सर्वांच्या श्रमदानाच्या मदतीची नितांत गरज आहे.त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी येथे श्रमदान करावे असे आवाहन पाणी फांऊडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
आता स्पर्धेचे फक्त 3 च दिवस शिल्लक राहिले आहेत आणि खालील 5 गावे राज्य स्तरीय स्पर्धेत पात्र होणेसाठी रात्र न दिवस काम करत आहेत या गावांना आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे म्हणून महाश्रमदान आयोजन केले आहे.या श्रमदानामध्ये तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी,शिक्षक संघटना, वकील संघटना,डॉक्टर संघटना,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर,सुट्टी असूनही सहभागी होणार आहेत.
तरी त्यालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, सार्वजनिक मंडळे, पानी फाउंडेशनचे सर्व प्रशिक्षणार्थी व स्त्री,पुरुष सर्वांनी या श्रमदानात मोठ्या संख्येने वरील पाच गावात सहभागी व्हावे हि विनंती आहे.हि खूप मोठी संधी आहे तालुक्यासाठी.आता नाही तर परत कधीच नाही.फक्त आजचा एक दिवस आपल्या तालुक्यासाठी,आपल्या मातृभुमीसाठी सहभागी व्हावे.श्रमदानाची वेळ –  सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here