जत | पं.स.ला कायमस्वरूपी बिडिओ, रिक्त पदे भरा ;सभापती मंगलताई जमदाडे | www.sankettimes.com

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पंचायत समितीला पुर्णवेळ बिडिओ,रिक्त अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षकांची पदे भरावीत,गेल्या दोन वर्षापासून प्रंलबिंत असणारी प्रशासकीय इमारातीला मंजूरी द्यावी या मागणीचे निवेदन पंचायत समिती सभापती मंगलताई जमदाडे यांनी मुख्यंमञी देवेंद्र फडणवीस यांना दिले.यावेळी आमदार विलासराव जगताप व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रभाकर जाधव,जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधव, पंचायत समिती सदस्या श्रीदेवी जावीर, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उमेश सावंत, नगरसेवक विजय ताड, प्रकाश माने, प्रवीण वाघमोडे,लक्ष्मण बोराडे, बागलवाडीचे सरपंच लक्ष्मी खांडेकर,उपसरपंच संतोष मुंजे,सुभाष खांडेकर ,शहाजी खिलारे, डॉ. शिवाजी खिलारे, सुभाष खाडेकर,अरुण खांडेकर आदी उपस्थित होते.
                या निवेदनात म्हटले आहे कि,जत तालुका भौगोलिकदृष्ट्या दृष्टी विस्ताराने मोठा असून तालुक्यात 116 ग्रामपंचायती आहेत.गेल्या दोन वर्षांपासून गटविकास अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध नाही. जत तालुक्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रशासकीय इमारत होणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विभागाची 14 एकर जागा उपलब्ध आहे. या जागेसाठी महसुलविभागाकडे प्रस्ताव दिला आहे. जत पंचायत समिती मध्ये 27 टक्के पदे रिक्त आहेत.ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी करण्यात आली आहे.
पंचायत समिती गटविकास अधिकारी हे पदावर गेली  2 वर्षापासून प्रभारी गटविकास अधिकारी आहेत.यासाठी आमदार विलासराव जगताप व खासदार संजयकाका पाटील यांचे मार्फत दोनवेळा वरिष्ठ विभागाकडे मागणी करुन सुध्दा कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळाला नाही.तरी तातडीने कायमस्वरूपी गटविकास अधिकारीची नेमणूक करावी.पशुवैद्यकीय दवाखाने,वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्रातील 50%पदे रिक्त आहेत.शिक्षण विभागातील 265 शिक्षकाचे पदे रिक्त आहेत.दवाखान्यास इमारती आहे तर वैद्यकीय अधिकारी नाही.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.पंचायत समिती सभापती व सदस्याकरिता विकासकामासाठी निधी देण्यात यावा. यासाठी सभापतीला वार्षिक निधी 25 लाख तर पंचायत समितीच्या सदस्यसाठी 15 लाख रुपयांचा वार्षिक निधी मिळावा. या निधीतून विकासकामे करता येईल.निवडून येताना सदस्यांनी जनतेला मोठी आश्वासने दिलेली असतात.मात्र कोणताही निधी नसल्याने नागरिकांच्या रोषाला सदस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदस्यांना निधीची उपलब्धंता करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

जत : जत दौऱ्यावर आलेले मुख्यंमञी देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्याचे निवेदन देताना सभापती मंगलताई जमदाडे, आमदार विलासराव जगताप, माजी सभापती प्रकाश जमदाडे आदी

Rate Card

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.