जत,प्रतिनिधी: जत शहरातील नगरपालिका समोर सागर मुंडेचा यांची खरेदी करत असताना बँक पडली होती.त्या 40 हाजार रोख व 40 हाजाराचे दोन चेक,आधारकार्ड असे साहित्य होते.ती पडलेली बँग माजी नगरसेवक मुन्ना पखाली युवा मंचच्या कार्यकर्त्यांना सापडली होती.बँगमधील आधारकार्डावरून त्यांनी मुंडेचा यांच्याशी संपर्क साधला व खात्री करून प्रामाणिकपणे ती बँग त्यांना परत केली. युवामंचचे सद्दाम आत्तार,अब्बुबकर मुजावर,राजू लोणारे,सोहेल आत्तार,तोहिद कटकटी यांनी मुंडेचा यांनी परत दिली.दरम्यान प्रामाणिकपणाबद्दल युवामंचचे सामाजिक कार्यकर्ते गणेश गिड्डे यांनी भेट घेऊन आभार मानले.
सागर मुंडेचा यांची हरविलेली बँग प्रामाणिकपणे परत देताना मुन्ना पखाली युवामंचचे कार्यकर्ते