सांगली | कॉग्रेसचे विश्वजित कदम बिनविरोध आमदार ! |

0

राज्यातील पहिली घटना

Rate Card

सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूकीत काँग्रेसकडून पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम हे रिंगणात आहेत. या पोटनिवडणूकीत भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विश्वजित कदम हे बिनविरोध आमदार झाले आहेत.
एखाद्या नेत्याच्या निधनानंतर, तेथील पोटनिवडणूकीत भाजपा कधी निवडणूक लढवत नाही असा निर्वाळा देत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केली.दरम्यान याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने विश्वजित कदम यांना पाठींबा दिला आहे तर शिवसेनेने सुद्धा पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूकीत आपला उमेदवार दिलेला नाही त्यामुळे विश्वजित कदम हे बिनविरोध आमदार झाले आहेत.दरम्यान सर्वत्र  विश्वजित कदम यांचे अभिंनदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.