संख | जेसीबी-दुचाकीची धडक दोघे गंभीर जखमी | www.sankettimes.com

0

संख,वार्ताहर:संख, (ता.जत)बसवेश्वर चौक जवळ मोटारसायकली व जेसीबी समोरासमोर धडक होऊन दोघेजण गंभीर जखमी झाला.गजानन शामराव बिराजदार(वय-26,),रामगोंडा(गौंडाप्पा)अबन्ना बिरादार(वय-23,दोघे रा.भिवर्गी)अशी जखमीची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,भिवर्गी येथील गजानन बिरादार, रामगोंडा बिराजदार हे दुचाकी (एमएच-10,सीके-9752)वरून शेळीचे कोकरू माडग्याळ येथील बाजारात विक्रीसाठी भिवर्गी हून निघाले होते.दरम्यान संख गावातील आरबीपी कॉलेज रोडवरून विजापूर कडे जाणाऱ्या रोडकडे जेसीबी येत असताना अचानक दुचाकी व जेसीबी धडक झाली.त्यात दुचाकी वरील एकजणाच्या पोटात जेसीबीचे पुढच्या बाजूच्या बकेटचे दात घुसल्याने गंभीर जखमी झाला. दुसऱ्यासही गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना संख प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून मिरजला हलविण्यात आले आहे.दोघाचीही प्रकृत्ती गंभीर आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यत उमदी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.