जत | भीषण अपघातात तीन ठार कोकळे -डफळापूर दरम्यान टेम्पो-कारची धडक,एकजण गंभीर

0

जत, प्रतिनिधी 

सांगली-जत रस्‍त्यावर कोकळेजवळ आयशर टेम्‍पो आणि अल्‍टो कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात जयसिंगपूरचे तिघेजण जागीच ठार झाले. जयसिंगपूर येथील ग्राहक संरक्षण मंचचे अध्यक्ष विशाल माळी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. एक गंभीर जखमी झाला. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघात झाला 

कोकळे गावाच्या पूर्वेस असलेल्या पूलावरून जतकडे येणाऱ्या रस्त्यावर आयशर टेम्पो व अल्टो कार यांची जोरदार समोरा समोर भीषण धडक झाली. अपघातातील मृत तिघेजण जयसिंगपूर येथून जतमधील लग्‍नासाठी अल्‍टो कारमधून आले होते. सांगली जत रस्‍त्यावर कोकळेजवळ आयशर टेम्‍पो आणि कारची समोरासमोर धडक झाली. लखन भिमराव मोहिते (वय-30,रा.सध्या शिरोळ,कोल्हापूर,कायम रहिवाशी जत), सुभाष मारूती चव्हाण (वय-31,रा.जयसिंगपूर)हे जागीच ठार झाले आहेत.सचिन प्रकाश मोहिते (वय-28) राजीव गांधी नगर,जयसिंगपूर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यांवर मिरज येथे उपचार सुरू आहेत. अपघात इतका भिषण होता की कारमधील तिघाचे मृत्तदेह कारमध्ये अडकले होते. घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी, जयसिंगपूर येथील चोघे मित्र जत येथील देवदास कॉलनी, उमराणी रोड येथे एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. विवाह आटपून ते जयसिंगपूरकडे (एमएच-9,सीएम-9976)कारने निघाले होते. कवटेमहाकांळ मधून केळी भरून जतकडे समोरून येणारा माल वाहतूक आयशर टेम्पो(एपी-04,टीडब्लू-2063) ची समोरासमोर भिषण धडक झाली त्यात कारचा पुढील भाग सुमारे तीन फुटापर्यत आत दबला गेल्याने चालक व समोरील दोघे व मागील सीटवरील एकजण जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी झाला आहे. आवाजाने परिसरातील नागरिक गोळा झाले, जत पोलिसांना कळविण्यात आले. जतचे सहा.पोलिस निरिक्षक रणजित गुंडरे व कर्मचारी यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवली. आयशर टेम्पो खाली घुसलेली कार जेसीबी व दोरीने बाहेर काढून मयत व जखमीना हलविण्यात आले.कवठेमहाकांळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान कोकळे पुढे कवटेमहाकांळ पोलिसाची हद्द असल्याने क महाकांळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.