जत | आवकाळी पाऊसाने झोडपले | www.sankettimes.com
जत,प्रतिनिधी: जत शहरासह तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह आलेल्या आवकाळी पाऊसाने झोडपले. गेल्या पंधरा दिवसापासून प्रंचड उन्हाळामुळे त्रस्थ नागरिकांना सायंकाळी थोडासा थंडवा मिळाला.
प्रंचड पारा वाढल्याने पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात होती.त्यात हवामान खात्याने वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास पुर्व बाजूकडून आलेल्या विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊसाने झोडपले. अनेक समतल भागात पाणी गोळा झाले होते. तर वादळी वाऱ्यामुळे काही आंबा बागाचे नुकसान झाले. तर झाडे व झाडाच्या फांड्या तुटल्या आहेत.