संघर्षमय विकास पुरुष पुरोगामी विचार जपणारा नेता : प्रकाश जमदाडे | www.sankettimes.com

0
22

संघर्षमय विकास पुरुष पुरोगामी विचार जपणारा नेता : प्रकाश जमदाडे,माजी सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली 

                

माननीय आमदार विलासराव जगताप यांनी जत च्या विकासासाठी व इथल्या दुष्काळी भागातील शेतीला व जनतेला पाणी मिळणेसाठी इंजिनिअर या पदाचा राजीनामा देवून राजकारणात प्रवेश केला.इथल्या  प्रस्थापितांच्या विरोधात संघर्षमय लढा देवून ते आमदार झाले.1988 साली म्हैशाळचे पाणी जत ला द्यावे .याकरिता प्रचंड मोठा मोर्चा काढला.व इतिहासात पहिल्यांदाच न्यायाधीशना बचतभवन स्वतः मध्ये येवून जामीन मंजूर करावा  लागला. त्या मोर्चा चे खरया अर्थाने फलित आता दिसू लागले. 

          आदरणीय आमदार विलासराव जगताप साहेबांनी जिल्हा परिषदचे उपाध्यक्षपद ,जत साखर कारखान्याचे चेअरमन,राज्य सहकारी बँकेचे संचालक,व पुणे विभागीय बॅंकेचे चेअरमन व गेल्या साडेतीन वर्षापासून आमदार म्हणून दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी ज्या ज्या संस्थेत पदाधिकारी म्हणून काम केले आहे. त्या ठिकाणी आपल्या कामाचा व विचाराचा ठसा उमटविला आहे  .ते राजकारणात आल्यापासून जत तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या सामान्य कार्याना तालुका व जिल्हा पातळीवर काम करणेची संधी मिळाली. जिल्हा पातळीवर जे.के माळी (मामा)डफळापूर ,गिरमल रकटे (सावकार )कोणबगी ,आण्णासाहेब गडदे( पांडोझरी )सिताराम व्हनखंडे (तिंकोडी )तम्मणगौंडा रवि (जाडरबोबलाद) आकाराम मासाळ (बाज)संजय सावंत( बनाळी) व मला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली च्या सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. कोणताही जातिभेद न करता क्षमता ओळखून त्या कार्यकर्त्यास काम करणेची संधी दिली.अतिशय स्पष्ट बोलणारा जे असेल ते तोंडावर खरे बोलणारा जत तालुक्याच्या विकासासाठी कायमपणे संघर्ष करत राहिले. याचेच उदाहरण म्हणजे देशाचा जाणता राजा मा.शरद पवार साहेब यांच्यासमोर जत तालुक्याच्या व्यथा मांडल्या. व आमच्या जत च्या हक्काचे पाणी व निधी आपल्याच मंत्र्यांनी पळवून नेले हे स्पष्टपणे व जाहीरपणे भाषणात सांगणारा एकमेव नेता .

                 आमदार झालेपासून म्हैशाळच्या पाण्यासाठी मा.खासदार संजय काका पाटील यांचे माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला  .व म्हैसाळ योजनाचा प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश झाला आहे.  जत तालुक्यातील म्हैशाळची योजना डिसेंबर 2018 अखेर पूर्ण करणेसाठी प्रयत्न शील आहेत. जत तालुक्यातील रस्ते अतिशय खराब होते.त्यांनी अर्थसंकल्प ,नाबार्ड,पवन उर्जा,सि.आर .एफ ,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,विशेष दुरस्ती ,जिल्हा वार्षिक नियोजन व 2515 या योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला .तीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर करुन मोठ्या प्रमाणात कामे चालू केली आहेत.जलयुक्त शिवार व  जलसंधारण कामास गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधारे,नाला खोलीकरण व रुंदीकरण ,मातीनाला बांध इत्यादी जलसंधारणाची कामे झाल्याने जत तालुक्यात एक ही टॅंकर चालू नाही. कार्यकर्ते ना मनापासून आधार देणारा या कणखर नेत्यास उदंड आयुष्य लाभो. 

           या विकासाच्या महामेरु आदरणीय आमदार विलासराव जगताप साहेब यांना  जमदाडे कुंटूबीय व जत पंचायत समितीच्या वतीने वाढदिवसाच्या  लाख लाख शुभेच्छा 


          शब्दाकंन : मा.प्रकाश जमदाडे,माजी सभापती


       माननीय आमदार विलासराव जगताप साहेब यांच्या माध्यमातून साडेतीन वर्षात झालेली विकासकामे.

  

  1. अं .न. योजनेचे नाव.  खर्च निधी
  2. ○जत तालुक्यातील म्हैसाळ योजना  

  3. ○155 सिंमेट बंधारे व के.टी.वेअर व जलसंधारणाचे काम 38.00 कोटी.
  4. ○रस्ते अर्थसंकल,नाबार्ड, विशेष दुरुस्ती,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,पवन ऊर्जा,सी.आर .एफ,जिल्हा वार्षिक नियोजन ,(D.P.D.C.)व 2515 .196.00कोटी .
  5. ○तीन राष्ट्रीय महामार्ग नवीन मंजूर 
  6.      नागज फाटा ते मुचंडी कर्नाटक हद्द (काम प्रगतीपथावर)315.00कोटी
  7. जत सांगोला राष्ट्रीय महामार्ग  (अल्पावधीत काम चालू होणार)194.00कोटी 
  8. उमदी ते विजापूर हद्द (अंदाजपत्रक करणे चालू आहे. )
  9. ○आमदार फंडातून सभामंडप,समाजमंदीर,पाणीपुरवठा,पिकअप शेड इत्यादी लोकोउपयोगी कामे.
  10. ○तिर्थक्षेत्र विकास योजना व अल्पसंख्याक योजना 22 कामे.82.00लाख.
  11. ○आरोग्य विभाग.-माडग्याळ येथे ग्रामीण रुग्णालय निवासस्थानासह इमारत बांधकाम पूर्ण.3.50कोटी 9 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर त्यापैकी 4 पूर्ण 5 प्रगतीत 4.25 कोटी.
  12. ○4 वीज उपकेंद्र मंजूर -वाळेखिंडी ,बसर्गी,व उटगी कार्यान्वीत अंकले उपकेंद्र  जागेअभावी काम सुरु नाही 6.00 कोटी 
  13. ○जत क्रिडा संकुल रनिंग ट्रॅक व संरक्षित भिंत 75.00लाख
  14. ○ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग या रस्त्यांची दर्जोन्नोती.
  15. 3 प्रमुख जिल्हा मार्ग मंजूर व 9 प्रमुख जिल्हा मार्ग मंजुरीसाठी शासनस्तरावर प्रस्तावित
  16. * सोन्याळ फाटा सोन्याळ जाडरबोबलाद ,लोणार,खैराव ,येळवी,जत ,उमराणी,ते कर्नाटक हद्द रस्ता राज्यमार्ग म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर.

अटैचमेंट क्षेत्र

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here