कार्यसम्राट… जत तालुक्याचे कणखर नेतृत्व; आ.विलासराव जगताप | www.sankettimes.com

0

 कार्यसम्राट…

जत तालुक्याचे कणखर नेतृत्व; आ.विलासराव जगताप 

जत सारख्या दुष्काळी भागातील  वारकरी सांप्रदायातील कुंटुंबात जन्मास आलेल्या आमदार विलासराव जगताप यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता.सोलापूर जिल्हा परिषदेत अभिंयता म्हणून नोकरीकरत असताना आपली माय भूमी असणाऱ्या जत तालुक्यातील जनतेविषयीची तळमळ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती.त्या तळमळीतून त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन सरळ राजकारणात उडीघेतली.प्रांरभी जत तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नाविषयी मोर्चे,अंदोलने करत प्रशासनाला जाग आणली.त्यातून जनतेचे प्रश्न मार्गी लागले.त्यातून सुरूझालेले विलासराव जगताप यांचे राजकारण आज जत तालुक्याचे किंबहुना जिल्ह्यातील राजकीय पटलावर किंगमेकर बनले आहेत. त्यांच्या कामाची व्याप्ती मोठी असल्याने त्यांच्या शंब्दाला मोठे वलयंआहे.

त्यांच्या रोखठोक व सडेतोड भुमिकेमुळे ते जत तालुक्यातील एक अगळेवेगळे व्यक्तिमहत्व ठरले आहेत. जत कारख्यान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोठे काम केले आहे. जत तालुक्यातून आमदार म्हणून मधूकर कांबळे व सुरेश खाडे यांना निवडून आणले होते.जत पंचायत समितीची सत्ता,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सभापती पदे त्यांनी जत तालुक्याला खेचून आणली आहेत.स्वत:ही भाजचे आमदार झाले अाहेत.गत पंचायत समिती व जिल्हा परिषदेत कमळ फुलविण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याने त्यांची मंत्रीपदासाठी नाव चर्चेत आहे.तालुक्यातील सुमारे 70 टक्के जनता आमदार विलासराव जगताप यांच्या पाठीशी आहे.

त्यामुळे जत तालुक्यातील राजकारणात विलासराव जगताप यांची गेला तीन दशकापासून निर्विवाद वर्चस्व आहे.त्यामुळे जत तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, त्यांच्या शंब्द मानला जातो.जत तालुक्यातील अनेक सामान्य कार्यकर्त्याना त्यांनी मोठ मोठ्या पदावर बसविले आहे.

त्यात आमदार सुरेश खाडे,माजी आमदार मधूकर कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णासाहेब गडदे, बाजार समिती माजी सभापती प्रकाश जमदाडे,शिक्षण सभापती तम्मानगौंडा रवीपाटील अादीना त्यांनी अनेकांना पदे मिळवून दिली आहेत.

जत तालुक्यात आमदार जगताप यांची राजकीय वर्चस्व निर्विवाद असल्याचे पुन्ह: पुन्हा सिध्द होत आहे. त्यांची आजही एकच ठाम भूमिका आहे की आमच्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ,जनतेच्या समस्या सोडवून विकासासाठी मदत करेल त्यांचे नेतृत्व मान्य करू त्यांच मुद्यावर त्यांनी दीर्घकाळ राष्ट्रवादीत काम केले. तेथेही त्यांच्या कामाची छाप पाडली दरम्यानच्या काळात भाजपचे विकासाचे धोरण स्विकारून खाजदार संजय पाटील यांना निवडून आणण्यात महत्वपुर्ण भूमिका बजावली त्यांच्या कार्याची दखल घेऊन विद्यमान आमदारांना डावलून भाजपने त्यांना आमदार पदाचे तिकिट दिले. पक्षश्रेंष्ठीचा विश्वास निवडून येऊन सार्थ करून दाखविला.जतचा किंगमेकर आमदार होत किंग बनला आहे.

सध्या जतला भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नासाठी ते थेट आपल्याच सरकारला खडे बोल सुनावत म्हैशाळचे पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना भाग पाडले.त्याशिवाय जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेचा पंतप्रधान सिंचाई योजनेत समावेश करून मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. तालुक्यात त्यामुळे कँनॉलची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.येत्या दोन वर्षात तालुक्यातील मोठे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच तालुक्यातील दळणवण वाढावे ,खेडी शहराशी जोडावित या उद्देशाने त्यांनी महामार्ग,गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी मोठा निधी आणला आहे.मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे झाली आहेत, सुरूही झाली आहेत.त्याशिवाय विकासातून उन्नत्तीकडे या उक्तीप्रमाणे जलसंधारण, जिल्हा नियोजन, पंचायत समिती, जिल्हा परिषद वित्तआयोग,खासदार, आमदार फंड,विशेष निधीतून प्रंचड कामे तालुक्यातील गावागावात झाली आहेत. अनेक प्रस्तावित आहेत.त्यामुळे जतच्या इतिहासात कार्यसम्राट आमदार म्हणून आमदार विलासराव जगताप साहेब यांची नोंद झाली आहे.

शंब्दाकन : परशुराम चव्हाण सर, डफळापूर

आमदार विलासराव जगपानी जतची महत्वपुर्ण असणाऱ्या म्हैशाळ सिंचन योजनेसाठी ताकत लावली आहे. त्यामुळे योजनेच्या कामावर त्यांचे बारकाईने लक्ष आहे.अनेकवेळा त्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणीबरोबर अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. पाणी योजनेसाठी प्रयत्नाची फोटोतून झलक 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.