जत |सभापतीच्या गावागावातील श्रमदानामुळे नागरिकांचा उत्साह दुणावला [व्हिडीओ]

0

 जत ,प्रतिनिधी : सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली वॉटर कप स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच र्मयादित राहिली नाही, तर यास्पर्धेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे. या स्पर्धेसाठी पंचायत समिती सभापती मंगल जमदाडे 

यांनी अनेक गावांना भेट देऊन श्रमदान केले. त्याच्या या कर्तृत्वाने श्रमदानच ‘अमीर’ झाले असून, ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे. 

Rate Card

ग्रामस्थांचे श्रम, आवश्यक साहित्यासाठी दानशुरांची मदत व पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे ज्ञान, अशी त्रिसूत्री या स्पर्धेची असून, या स्पर्धेमुळे जलसंधारणाचे नवे पर्व जत तालुक्यात सुरू झाले आहे. या स्पर्धेत सहभाग घेणार्‍या गावातील श्रमदानाची दखल घेत सभापती मंगलताई जमदाडे भेट देत अाहेत. तालुक्यांमध्ये 109 वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान सुरू आहेत.जत तालुक्यात श्रमदानाची चळवळ रुजत असतानाच येळवी,निगडीसह अनेक गावात खुद्द सभापती सौ.जमदाडे यांनी केलेल्या श्रमदानामुळे ग्रामस्थांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. श्रमदान करणार्‍यांचा उत्साह वाढला. तेथे उपस्थित प्रत्येकाने आपल्या हातात टिकाव, फावडे, टोपले घेऊन श्रमदान केले.सभापती मंगलताईच्या कृतीने श्रमदानाला त्यांनी गावे ‘अमीर’ केल्याचा भास झाला. श्रमदात्यांबरोबर तब्बल तासभर श्रमदान केले.तसेच उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन ही करतात. यावेळी सदस्या सौ. जावीर,अभय जमदाडे यांनीही श्रमदानात सहभाग घेतला.  

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.