जत | मुद्रांक विक्रीत नागरिकांची लूट | www.sankettimes.com

0
15





जत,प्रतिनिधी: जत तहसील कार्यालयात मुद्रांक विक्रेत्यांचा मनमानी कारभार सुरू असून  100 रुपयांच्या मुद्रांकासाठी 130-150 रुपये वसूल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मुद्रांक विक्रेत्यांच्या या मनमानीपणावर पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी होतआहे.  अधिकारी घेतात कमिशन?प्रशासनातील अधिकार्‍यांच्या भरवशावर ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाचा आराखडा तयार केला जातो. मात्र, जत तहसील कार्यालयात मुद्रांक विक्रेत्यांकडून अधिकचा दर आकारून उलट अधिकार्‍यांनाच कमिशन द्यावे लागते, असे उत्तर दिले जाते. त्यामुळे अधिकारी सुद्धा कमिशन घेतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.येथील तहसील कार्यालयात मुद्रांक विक्री केली जाते. विविध शासकीय कामासाठी मुद्रांकाची गरज भासत असल्याने नागरिक येथील विक्रेत्यांकडून मुद्रांकाची खरेदी करतात. मात्र, 100 रुपयांच्या मुद्रांकासाठी 130-150 रुपये आकारण्यात येत आहेत. याबाबत विक्रेत्यांना विचारणा केली असता, अधिकार्‍यांनाही कमिशन द्यावे लागत असल्याचे धक्कादायक उत्तर त्यांच्याकडून मिळत आहे. वास्तविक मुद्रांकाची विक्री ही खरेदी मुळातच केली जाते. मात्र, कमिशनच्या नादात सर्वसामान्यांच्या खिशाला चुना लावत मनमानीपणे दर आकारण्यात येतात. विविध शासकीय व निमशासकीय तसेच खरेदी-विक्रीच्या कामासाठी मुद्रांकाची गरज पडते. यासाठी ग्रामीण भागातून नागरिक तहसील कार्यालयात बसणार्‍या विक्रेत्यांकडून मुद्रांक खरेदीसाठी जातात. मात्र, त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत विक्रेते मनमानीपणे पैसे वसूल करीत असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते. 100 रुपयांच्या मुद्रांकासाठी 120-150 रुपये आकारण्यात येत असल्यामुळे गोरगरीब जनतेवर 20-50 रुपयांचा अधिकचा आर्थिक भार पडत आहे. सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या या प्रकारावर पायबंद घालून दोषी मुद्रांक विक्रेत्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी  सामान्य नागरिकांतून होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here