जत | अरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला ; जत तालुक्यातील प्रतापपूर येथील थरार | www.sankettimes.com

0

अरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला 

जत तालुक्यातील प्रतापपूर येथील थरार : 5 पोलिस जखमी,तीन वाहनांचे नुकसान,6 महिलासह 20 जणावर गुन्हा दाखल

जत,प्रतिनिधी जत तालुक्यातील प्रतापपूर येथे आलेल्या सातारा येथील मोक्‍कामधील आरोपी दत्ता जाधव याला अटक करण्यासाठी गेलेल्या सातारा पोलिस व जत (जि. सांगली) पोलिस ठाण्यातील पोलिसावर्ती मंगळवारी रात्री हल्ला करण्यात आला. तुफान दगडफेक करून पोलिस गाड्याची तोडफोड करण्यात आली. आरोपी दत्ता जाधवला पळवून लावण़्यासाठी जाधवचे साथीदार व काही स्थानिक लोंकानी जमाव करून  पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने सांगली, सातारासह राज्याच्या पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या राड्यात दत्ता जाधव फरार झाला असून हल्लेखोर दहा जणांना अटक करण्यात आली आहे.युवराज रामचंद्र जाधव, भेजा वाघमारे, खली ऊर्फ कृष्णा बडेकर, अमर भांडे, शिवाजी पवार, अमोल होनेकर, जया जाधव, बंडा पैलवान, दीपक लोंढे, लल्‍लन जाधव, सूरज ऊर्फ पप्पू घुले, मनीषा जाधव, धनू बडेकर, आरती जाधव, ऋतुजा जाधव, मयुरी ऐवळे, करिष्मा हेगडे, मथुरा ऐवळे (सर्व रा. सातारा) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून यातील दहा जणांना जत पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत सपोनि मयूर वैरागकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दत्ता जाधव (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याच्यावर सध्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्‍का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र सध्या तो पसार असल्याने सातारा पोलिस त्याचा शोध घेत होते. मंगळवार, दि. 24 रोजी दत्ता जाधव हा प्रतापपूर येथे यात्रेसाठी जाणार असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दत्ता जाधव याला अटक करण्यासाठी वाठार पोलिस ठाण्याचे सपोनि मयूर वैरागकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक जत येथे सातार्‍यातून पाठवण्यात आले.जत येथे सातारा पोलिसांचे पथक पोहचल्यानंतर प्रतापपूर येथे प्रतापसिंहनगरचे व दत्ताचे अनेक सहकारी असल्याचे समजले. त्यामुळे सातारा पोलिसांनी आणखी पोलिस बळ वाढवून घेण्यासाठी सातारा येथून आणखी एक पथक व जत येथील पोलिसांची मदत घेतली. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एकूण 20 पोलिस अधिकारी, कर्मचारी एकत्र होते. प्रतापपूर येथे या पथकाला दत्ता जाधव दिसला. मात्र, पोलिसांना पाहताच गर्दीचा व अंधाराचा फायदा घेवून दत्ता जाधव तेथून पसार झाला.पोलिसांनी दत्ता जाधव याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करताच उपस्थित जमावाने त्यामध्ये अडथळा आणून उलट पोलिसांवर हल्ला केला.उपस्थित पन्‍नासहून अधिक जमावाने पोलिसांना वेढल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यामुळे गोंधळ उडाला. दत्ता जाधव याला पसार होण्यासाठी मदत करणार्‍यांची पोलिसांनी धरपकड करताच जमावातीलसपोनि मयूर वैरागकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जीवे मारण्याच्या प्रयत्न, शासकीय कामात अडथळा, मारहाण, धक्‍काबुकी, तोडफोड यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान हल्ल्यातप्रोबेशनरी एसपी पवन बनसोड, सपोनि मयूर वैरागकर, सूर्यकांत जाधव, अतुल कुंभार, अवधूत धुमाळ, सहदेव तुपे, अकबर खान, अभिजित काशीद, सचिन पाटोळे, वैभव सावंत, अनिल वसावे, रोहित कणसे, प्रमोद सोनवणे हे सातारा पोलिसांचे पथक कारवाईसाठी जतला गेले होेते. जतचेे पोलिस उपअधीक्षक वाकुडे, पोनि ताशीलदार, महिला पोलिस अर्चना शिंदे, जे. एम. राणे, व्ही. एम. मुजावर, पी. बी. खाडे, एस. टी.निकम, ए. ए. शिंदे यांनीही एकत्रितपणे कारवाईचा प्‍लॅन केला होता. मात्र, दत्ता जाधव टोळीच्या हल्ल्यात सातारचा एक पोलिस व जतमधील तीन महिला पोलिस जखमी झाले आहेत.जत तालुक्यात खळबंळ, आरोपींना पोलिस कोठडी 

जत तालुक्यातील प्रतापपूर येथे अशी घटना घटल्याने व थेट पोलिसावर हल्ल्याचा प्रकार झाल्याने खळबंळ उडाली आहे.जत पोलिसाकडूनही धरपकड सुरू आहे. जमाव करणारे अन्य काही संशियत ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. दरम्यान अटक आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रतापपूर येथे अरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला करून पोलिस वाहनाची मोडतोड करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.