जत शहरातील जनसामान्याचा युवक नेता, सामान्याच्या सुख दु:खात धावून जाणारा आपला माणूस म्हणून शहरभर परिचित असलेले सिध्दीविनायक ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्थेचे व्हाय.चेअरमन प्रविण पाथरूट हे व्यक्तिमहत्व होत.
त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त..
जत शहरात लहान वयापासून मित्राचा गराड्यात वावरणारे जिगरी मित्र,लोकहिताच्या कामामुळे जनतेचे युवक नेते बनलेत.स्टँडलगतच्या समता चौकात प्रविण पाथरूट यांनी वेगळेपण जपत एक वलयं तयार केले आहे. समता चौक गणेश मंडळ स्थापन करून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत सामाजहिताची कामे करण्यात ते अग्रेसर असतात. कोणाच्याही सुख दु:खात धावून जाण्याची ख्याती.सामान्यतल्या सामान्य लोकासाठी आपला व हक्काचा माणूस म्हणून प्रविण पाथरूट यांच्याकडे बघितले जाते.जत शहरातील भविष्यातील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.अशा युवक नेत्याचा आज वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. शहरात वाढदिवसानिमित्त सामाजहिताची कामातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न त्यांच्या मित्र परिवरातून आज होत आहे.दत्त कॉलनी व सातारा रोड येथे सार्वजनिक नळांना स्वखर्चाने चाव्या बसवण्याचा उपक्रम वाढदिवसा निमित्त घेण्यात येणार आहे.
शंब्दाकंन : गणेश गिड्डे, जत