मासिक बैठकीत विरोधी सदस्यांचा आरोप : उमदीतील एमबीबीएस डॉक्टर,सह अनेक विषयावर चर्चा
जत,प्रतिनिधी: जत पंचायत समिती मध्ये मागील एक वर्षात विकास कामाऐवजी ग्रामसेवकांच्या बदल्याच्या भानगडी करण्यात प्रशासन समाधान मानत आहे.अनेक ग्रामसेवकांची गावे सत्ताधारी गटाच्या सोयीनुसार बदलली आहेत. असे प्रकार थांबले पाहिजेत अन्यथा नियमबाह्य बदल्या झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात येईल, असा इशारा पंचायत समिती सदस्य रविंद्र सावंत व दिग्विजय चव्हाण यानी मासिक बैठकीत बोलताना दिला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती मंगल जमदाडे होत्या.
पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकांच्या बदल्यांचे राजकारण केले जात आहे. काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकाने विरोधी भाजपच्या कार्यकर्त्यांचे बेकायदेशीर काम करण्यासाठी नकार दिल्यानंतर त्या ग्रामसेवकाची प्रशासन कोणतेही सबळ कारण नसताना बदली करत आहे. त्यामुळे गावातील विकास कामात व्यत्यय निर्माण होत आहे.हे जाणून बुजून केले जाते, असा आरोप सदस्यांनी सभागृहात केला.आक्रमक सदस्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ म्हणाले, यापुढे असे प्रकार घडणार नाहीत,सर्व ग्रामसेवकच्या बदल्यास स्थगिती देण्यात येईल अशी ग्वाही दिली.
तालुक्यातील 14 शाळेवर शिक्षक नाहीत.कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग आहे.सुमारे 319 प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाचा बोजवारा उडाला आहे. जि. प. शिक्षण सभापती जत तालुक्यातील असूनही हा प्रलंबित प्रश्न का सुटत नाही. अशी तक्रार सदस्यांनी सभागृहात मांडली. असता गटविकास अधिकारी म्हणाले,शिक्षण विभागातील लिपीकास मराठी लिहिता व वाचता आणि टायपिंगही करता येत नाही. यासंदर्भात आम्ही वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.अशा कर्मच्याऱ्यांची बदलीसाठी शिफारस करु नये,अन्यथा यापुढे असाच कारभार सुरू राहील अशी खंत त्यांनी व्यक्त केली. उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस पदवी असलेले वैद्यकीय अधिकारी नाहीत.मारामारी,अपघातच्या घटना घडल्यास पोलिस कारवाईसाठी जखमींना मिरज येथे जावून तेथे उपचार घेवून वैद्यकीय प्रमाणपत्र आणावे लागत आहे.त्यामुळे
प्रथमता गावपातळीवर जखमीवर अन्याय होतो.जखमीवर खरेतर उमदीत उपचार होणे गरजेचे आहे. मात्र
निढर आरोग्य यंत्रणेमुळे नाहक खर्च,त्रास व धोका घेऊन माडग्याळ, जत किंवा मिरज येथे जखमींना उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकावर अन्याय होत आहे.
अशी तक्रार त्या भागातील सदस्यांनी सभागृहात केली असता रिक्त जागा भरण्यात येतील असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.डी. जी.पवार यांनी सांगितले.पाणी पुरवठा, दळणवळण,बांधकाम,घरकुल,रस्ते,एका
विष्णू चव्हाण,श्रीदेवी जाविर,अर्चना पाटील,सुनंदा तावशी यांनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.उपसभापती शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.





