बेळोंडगी | बसवेश्वर जंयती उत्साहात संपन्न | www.sankettimes.com
बेळोंडगी,वार्ताहर:बेळोंडगी (ता.जत) येथे जगत् ज्योती श्री.महात्मा बसवेश्वर 885 वा जयंती निमित्त श्री जगद्ज्योती बसवेश्वर जयंतीत्सव मंडळ बेळोंडगी यांच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी 8 वाजता श्री जगद्ज्योती बसवेश्वर फोटो पूजन करून अभिवादन करण्यात आले. गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली.महाप्रसाद वाटप झाले. दुस-या दिवशी गुरूवारी रात्री कन्नड मनोरंजन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लिंगायत समाजाचे नेते डाॅ.रविंद्र अरळी.अॅड.चन्नाप्पाण्णा होर्तिकर,सुभाष पाटील संख,सिध्दूआण्णा शिरसड,चंद्रकांत गुड्डोडगी पदाधिकारी उपस्थित होते. जयंती मंडळाचे सोमनिंग बोरामणी,सागर मणूर,धानेश बुरकुले,सुरेश हत्तळ्ळी यांनी नियोजन केले.

बेळोंडगी ता.जत येथील श्री. बसवेश्वर जंयती निमित्त आयोजित कार्यक्रामात बोलताना डॉ.रविंद्र आरळी व मान्यवर