जत | शहरात बसवेश्वर जंयती मोठ्या उत्साहत संपन्न | www.sankettimes.com
जत,प्रतिनिधी : जत शहरात जगत् ज्योती श्री. बसवेश्वर जंयती मोठ्या उत्साहत संपन्न करण्यात आली.गेली दोन दिवसापासून बसवेश्वर जंयती उत्सव जत शहरात साजरा करण्यात येत आहे. प्रांरभी विजापूर रोडवरील बसवेश्वर चौकीतील श्री. बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात भव्य ट्रकमध्ये सर्व महापुरूषाचे फोटो लावून सजविण्यात आले होते. त्यात बसवेश्वरासह,छत्रपती शिवाजी महाराज,संत गाडगेबाबा,महात्मा फुले,संत रोहिदास,छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर,ताराराणी,कित्तूर चन्नम्मा,राणी लक्ष्मीबाई आदी महापुरूषाचे फोटो बसविण्यात आले होते.मिरवणूक झांजपथक,डॉल्बी,भव्य फटक्याची आतषंबाजी, सह शहरातील विविध चौकातून मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीत प्रथमच मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या. जंयती उत्सव समितीकडून नियोजन करण्यात आले.
जत शहरात जगत् ज्योती श्री. बसवेश्वर जंयती भव्य मिरवणूक काढण्यात आली.