जत | वादळी वाऱ्यामुळे तिकोंडीत बाग कोसळली | www.sankettimes.com

0

तालुराभर मोठे नुकसान : शेगाव परिसरात आंबा बागाचे नुकसान 

जत,प्रतिनिधी: तालुक्यातील तिकोंडी येथे दोन शेतकऱ्यांची काढणीसाठी आलेली द्राक्षबाग वादळी वाऱ्यामुळे मंगळवारी सायंकाळी कोसळून सुमारे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी महसूल विभागाने बुधवारी पंचनामा करून  मदतीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.

    जत तालुक्याच्या पूर्व भागात मंगळवारी सायंकाळी  साडेसहा वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.यावेळी काढणीसाठी आलेली  संगोडा आप्पाराया अमृतहट्टी यांची एक एकर व मारुती शिवाप्पा व्हनखंडे यांची दिड एकर द्राक्षबाग अचानक कोसळली.त्यामुळे या दोघांचे मिळून सुमारे तीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. तर भैराप्पा निंगप्पा अमृतहट्टी,आप्पासाहेब निंगाप्पा अमृतहट्टी,रुपेश सिद्राया व्हनखंडे या शेतकऱ्यांनीे द्राक्षे काढून  करडछाटणी केली होती. त्यानंतर फुटलेल्या कोवळ्या पानावर पावसाचे थेंब पडून पाने फाटली आहेत. तर कांही ठिकाणी काड्या मोडून नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षात अशा झाडाना अत्यल्प प्रमाणात फळे येण्याची शक्यता आहे. पाने फाटून व काडी मोडून सुमारे वीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.असे एकत्रितपणे सुमारे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तिकोंडी प्रमाणे तालुक्यात बिळूर , साळमळगेवाडी,दरीबडची, जाल्ह्याळ येथील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.महसूल विभागाने त्याचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी यानी केली आहे.शेगाव:

Rate Card

शेगाव(ता.जत)येथील शेतकरी धोंडीराम माने व प्रवीण माने यांच्या मालकीच्या शेतातील केशर जातीच्या आंब्याच्या बागेचे वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका आंब्याच्या बागेला बसून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

          शेगाव येथील शेतकरी धोंडीराम माने व प्रवीण माने यांनी  गट नं 1339 या क्षेत्रावर केशर जातीच्या आंब्याची लागवड केली आहे. पाचवर्षांपूर्वी 600 झाडांची लागवड केली होती. यावर्षी वेळेत बहर येऊन फळही चांगल्या स्थितीत आले होते. मात्र रविवारी झालेल्या वादळी वारे व पावसाने बागेचे नुकसान झाले.यावर्षी माने कुटुंबीयांनी एक ते  दीड टन आंबा उत्पादन मिळण्याचा अंदाज अपेक्षित होता.वादळी वाऱ्याने दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने   पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी माने यांनी केली आहे.

जत : तिकोंडी येथे विक्रीयोग्य वादळात पडलेली द्राक्षबाग, तर शेगाव येथील आंबा बागात पडलेले आंबे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.