माडग्याळ | पाणी फाऊंडेशन कामाला गती | www.sankettimes.com

0

माडग्याळ,वार्ताहार:

माडग्याळ (ता.जत) येथील पाणी फाऊंडेशन कामाला गती लागली आहे. माडग्याळ हा दुष्काळी भाग आहे.त्यातून मुक्ती करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.म्हणून हातात खोरे, टिकाव, पाटी घेऊन तब्बल तीन तास अंगाला घाम येऊन पर्यत नागरिक राबत आहेत. गावात कायम स्वरपी पाणीटंचाई आहे. उन्हाळ्यात माडग्याळमध्ये कायमस्वरूपी भीषण पाणी टंचाई सामना करावा लागतो. या टंचाईवर मात करण्यासाठी सगळेजण श्रमदान  करावे.माडग्याळमध्ये पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा क्रियाशिल प्रयोग राबवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. पाण्याची पातळी एकच कशी वाढेल ,याचे तंत्रज्ञान ही आत्मसात करून त्या पद्धतीने कामे चालू आहेत. पाणी आपल्याच गावात आडवून ठेवण्यासाठी नक्कीच या पाणी फाऊंडेशनचा उपयोग होणार आहे. हे लक्षात आल्याने नागरिक एकवटले आहेत. श्रमदानात  पंचायत समिती सदस्य विष्णू चव्हाण सर , तुकाराम सावत,पाडूरंग सांवत,डॉ.शिदे सर,सुनिल घाटगे,कामाणा बंडगर,डॉ. रवि बुध्याळ सर,आदी मान्यवर उपस्थित होते.

माडग्याळ ता.जत येथील पाणी फौंडेशनच्या श्रमदानात हात राबू लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.