डफळापूर | भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती मोठ्या उत्साहत संपन्न | www.sankettimes.com
डफळापूर, वार्ताहर : येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती मोठ्या उत्साहत संपन्न झाली.यावेळी डॉ.बाबासाहेबाच्यां प्रतिमेस माजी सभापती मन्सूर खतीब व जत नगरपरिषदेचे बांधकाम सभापती भुपेंद्र कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच व्याख्यान, भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी युवक नेते परशुराम चव्हाण, ग्रा.प.सदस्य बंडू पाटील,संजय कांबळे,क्रॉमेड हणमंत कोळी, अलवीन शेलार, आदी मान्यवर उपस्थित होते.
