जत | कुस्त्यांचा मौसम,मात्र कला जगणे गरज | www.sankettimes.com
जत,प्रतिनिधी : सध्या तालुक्यातील गावागावात ग्रामदैवताच्या यात्राच्या निमित्ताने कुस्तीचा मौसम चालु आहे कारण जत्रा ही कुस्त्यांना मिळालेली संजीवनी. पण संजीवनी नसुन फक्त टेकु बनुन तात्पुरते मनोरंजनाचे साधन म्हणून आज याचा वापर होत आहे. असे असले तरी कुस्त्यांच्या या फडात खरे मल्ल कमी पण हौशेनौशे युवक फक्त बक्षीसासाठी खेळत असल्याने कुस्तीचा खरा आनंद हा आता लोप पावत आहे. मातीमधला कुस्तीचा खेळ हा वाचला पाहिजे यासाठी खास उपाययोजना आता करणे गरजेचे आहे. जुन्या लोकांनी कुस्ती खेळाला डोक्यावर घेतले हा वारसा आता जपण्याच काम आत्ताच्या पिढीवर आज आहे.

तळगाळातील मुलांना खेळाच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या तर काय होवू शकते याचा प्रत्यय आपण कॉमनवेल्थमध्ये पाहिला. भारतात नेहमीच क्रिकेट सारख्या खेळाला जास्त महत्व दिल्याने पारंपारीक खेळाला याचा फटका बसल्याचे चित्र पहावयास मिळते. ग्रामीण भागातील रांगडी मुले कुस्तीच्या आखाड्यात घाम गाळून सराव करतात परंतू त्यांना पुरेशा सोयीसुविधा, संधी मिळत नसल्याने मातीचा खेळ हा मातीतच राहतोय. याकडे शासनाने लक्ष देऊन याला दर्जेदारपणे इतर खेळांबरोबर स्थान देवून ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याचे गरज आहे. जत तालुक्यातील ग्रामीण भागाचा विचार केला तर आज हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कुस्तीचे आखाडे शिल्लक राहिले आहेत. आखाड्यात तयार होणाऱ्या भविष्यातील कुस्तीपट्टूंना योग्य प्रशिक्षणासाठी कोणत्याच उपाययोजना दिसत नाहीत. ऑलंपिक स्पर्धेत भारताली पदक मिळवून देणारे खशाबा जाधव हे याच मातीतले. याचा आदर्श ठेवून अनेक होतकरू तरूण योग्य संधीची वाट पाहत आहेत. पण या संधी उपलब्ध करण्याकरीता ग्रामीण भागात नव्याने कुस्त्यांचे आखाडे रंगले पाहिजेत. केवळ जत्रा-यात्रांच्या माध्यमातून कुस्तींगीरांचे भवितव्य ठरवून काहीच होणार नाही. यासाठी योग्य ती पाउले उचलून या मातीतील क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्याबरोबर याच्या पुर्नबांधणीला सुरूवात करणे गरजेचे आहे.ही सुरवात झाली तर अाजही खशाबा जाधव सारखे मल्ल याच मातीतून जन्माल येतील अन भारताला एका शिखरावर पोचवून ठेवेल. शासनाने ग्रामीण भागातली तमाम कुस्तीगीरांच्या समस्या लक्षात घेवून अनुदानाची तरतुद व कौशल्यविकासाठी काही तरी करण्याची गरज आहे. “आम्ही मातीतील लेकरे, माती आमची आई…कुस्तीच्या आखाड्याच्या पुर्नबांधणीसाठी करा आता घाई”