जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीच्या वतीने झालेल्या मनरेगा घोटाळ्यातील झालेल्या बेकायदेशीर कामाची बिले काढण्याचा घाट काही ठेकेदार व पदाधिकाऱ्यांनी घातला आहे. कोणतीही बिले तपासणी शिवाय देऊ नयेत अन्यथा कॉग्रेस रस्त्यावर उतरेल असे निवेदन जत कॉग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी विजय काळमपाटील,जिपचे उप. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बगाडे यांना देण्यात आली.
जत तालुक्यात पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत.त्यात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आल्याने बोगस बिले प्रशासनाने थांबविली होती. त्यात मोठ्या प्रमाणात ठेकेदारांनी प्रवेश करून शासनाच्या कोट्यावधीच्या निधीवर डल्ला मारत घरे भरून घेतली होती.मात्र घोटाळा समोर आल्याने बिले थांबविण्यात आली.त्यांनतर अनेक चौकशा,तपासण्यात करण्यात आल्या.प्रत्येक वेळी शेतकऱ्यांची बिला पेक्षा ठेकेदारांची बिले देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदारांनी केलेल्या काही बोगस कामाची बिले काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.योजनेतील खरे लाभधारक शेतकऱ्यांची प्रत्यक्षात बिले न देता बेकायदा 100 टक्के कुशल असलेली सार्वजनिक कामाची बिले देण्याचा प्रयत्न सुरू आहे.ती बिले देऊ नयेत. तसेच जत तालुक्यातील मनरेगात मोठा घोटाळा निश्चित झाला आहे. त्यामुळे कोणतीही बोगस बिले काढण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा जत कॉग्रेसच्या वतीने तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांनी दिला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडक,संतोष पाटील, पं.स.सदस्य दिग्विजय चव्हाण, निलेश बामणे, काका शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जत पंचायत समितीच्या मनरेगात घोटाळाल्यातील बिले देऊ नयेत असे निवेदन जत कॉग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी विजय काळमपाटील यांना दिले.