जत | जतच्या 13 रस्ते कामासाठी 2 कोटीचा निधी I www.sankettimes.com

0

जतच्या 13 रस्ते कामासाठी 2 कोटीचा निधी 

आ.विलासराव जगताप : ग्रामविकासच्या 25:15 योजनेंतर्गत निधी उपलब्धं

Rate Card

जत,प्रतिनिधी : जतच्या रस्त्यासाठी ग्रामविकास विभागाकडून 2 कोटीचा निधी मंजूर झाला आहे.जतचे आमदार विलासराव जगताप यांनी जत तालुक्यासाठी 2515 योजनेंतर्गत ग्रामविकास मंत्री पंकाजाताई मुंडे यांच्याकडे या निधीची मागणी केली होती.त्यांच्या पत्रास मंजुरी मिळाली असून दोन कोटीच्या निधीतून तालुक्यातील तेरा मार्गची कामे होणार आहेत.

जिल्ह्यात सर्वात मोठ्या असणाऱ्या जत तालुक्यातील रस्त्यांचा मोठा बॅकलॉग शिल्लक आहे.अनेक रस्ते नादुस्थ आहेत.त्यामुळे दळणवणावर परिणाम झाला आहे.त्यामुळे रस्ते मजबूत व्हावेत यासाठी आमदार जगताप यांनी तालुक्यातील रस्ते सुधारणा करण्यासाठी मंत्री पंकाजाताई मुंडे  निधीची मागणी केली होती.त्यास मजूंरी मिळाली असून त्यात जत शहरातील कलावती माता मंदिर परिसरामध्ये पेव्हिंग बॉल्क बसविणे (10 लाख), मौजे उमराणी येथे ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत पेव्हिंग बॉल्क बसविणे (15 लाख), सिंदूर ते बेरडहटटी (कर्नाटक हद्दीपर्यंत) रस्ता सुधारणा करणे (20 लाख),मौजे डोर्ली (पवारवाडी) ते हिवरे कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे (15लाख), मौजे येळवी ते हंगीरगे रस्ता सुधारणा करणे (20 लाख), मौजे धूळकरवाडी ते हुबनुर (कर्नाटक हद्दीपर्यंत) रस्ता सुधारणा करणे (15 लाख), मौजे तिकोंडी ते कागनरी रस्ता सुधारणा करणे (25 लाख), मौजे लकडेवाडी येथील अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे व पेव्हिंग बॉल्क बसविणे (10 लाख),मौजे डफळापूर येथे अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे (15 लाख), मौजे बाज येथे ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत पेव्हिंग बॉल्क बसविणे (15 लाख),मौजे जाडरबोबलाद  येथील अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे व पेव्हिंग बॉल्क बसविणे (10 लाख), मौजे जाडरबोबलाद येथे लकडेवाडी रस्ता ते करुंगलेवस्तीकडे जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे(20 लाख), मौजे माडग्याळ येथील अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे व पेव्हिंग बॉल्क बसविणे (10 लाख) या कामांचा समावेश आहे. सदर पत्र गेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात दिले होते.याला  दि.31 मार्चला तात्काळ मंजुरी मिळाली आहे.सर्व कामे मंजूर होऊन कामांसाठी एकूण 2 कोटीचा निधी जत तालुक्यासाठी आला आहे. लवकरचं यातिल कामे सुरू होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.