जत | 31 मार्च पुर्वी कामे उरकण्यासाठी ठेकेदार, अभियंत्यांचे साटेलोटे | www.sankettimes.com

0

जत:-सांगली जिल्हा परिषद व राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जत तालुक्यातील अर्धवट स्थितीत चालू असलेले रस्ते, विहिरी व तदसंबधीत अनेक विविध विकासात्मक कामे घाईगडबडीत आटपून त्याची बिले वित्त विभागाकडे सादर करून लाखो रूपये पदरात पाडून घेण्याचे ठेकेदाराचे प्रयत्न चालु आहे.या सर्व प्रकाराला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ल.पा.,बांधकाम विभागाच्या अभियंत्याचे व वित्त विभागाच्या अधिकाऱ्याचे सहकार्य असल्याचे दिसत आहे.

Rate Card

चालू असलेली विविध रस्त्यांची कामे घाईगडबडीत उरकण्याचा प्रकार चालू आहेत.जिल्हयात 2017-18 साठी प्राप्त झालेला निधी शक्यतो मागे जाऊ नये तो 31 मार्च पुर्वी खर्च पडावा यासाठी कामे झाली तरी उशिरा करा,पण बिल 31मार्च पुर्वी खर्च घाला असे वरिष्ठांचे तोंडी आदेश असल्यामुळे आणि अभियंता व ठेकेदार या दोघांची मिलीभगत असल्यामुळे हे प्रकार जिल्ह्यात आढळून येत आहे.दरम्यान याची दखल पारदर्शक कारभाराची हमी देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी अशी अपेक्षा गावगावच्या समाजकर्त्याकडून होत आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.