कुंभारीतील श्रीनिवास कुस्ती केंद्रास जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची भेट
जत,प्रतिनिधी : कुंभारी ता.जत येथील श्रीनिवास भोसले कुस्ती प्रशिक्षण केंद्रास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली.
जत सारख्या दुष्काळी भागात कुस्तीची कला जागृत्त ठेवण्याचे काम या कुस्ती केंद्रातून अखंडपणे सुरू आहे.अनेक पैलवान या माध्यमातून यशस्वी झाले आहेत. अशा प्रसिध्द केंद्रास देशमुख यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत शिक्षण सभापती तम्मानगौंडा रवीपाटील,सदस्य सरदार पाटील, अजिक्यतांराचे अॅड.प्रभाकर जाधव,शरणाप्पा जावीर आदि मान्यवर उपस्थित होते.
कुंभारी येथील या कुस्ती केंद्रामुळे ग्रामीण भागातील पैलवान तयार करण्यासाठी मदत झाली आहे.या केंद्रातून दर्जेदार पैलवान तयार व्हावेत,ते राज्य,देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत अशा शुभेच्छा देशमुख यांनी दिल्या.तसेच केंद्रे सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. केंद्राचे प्रशिक्षक शेंडगे सर यांनी देशमुख यांचा सत्कार केला.
कुंभारी ता.जत येथील श्रीनिवास कुस्ती केंद्रास जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची भेट दिली.यावेळी देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.