आंवढी | हल्लाबोल यात्रा तयारीसाठी राष्ट्रवादीकडून मँरेथॉन बैठका | www.sankettimes.com

जत,प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉग्रेस आयोजित हल्लाबोल यात्रा 4 एप्रिलला जत येथे येत आहे. त्यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी मँरेथॉन बैठकीचे नियोजन केले आहे. गुरूवारी शेगाव भागात बैठका घेण्यात आल्या.भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर,व्यापारी, कष्ठकरी जनता वैतागली आहे.जिएसटी, नोटाबंदी सारखे निर्णय लादले आहेत. नुसती आश्वासने देऊन जनतेला भुलविणाऱ्या सरकार विरोधात आक्रमकता दाखविणे गरजेची आहे.त्यासाठी हल्लाबोल यात्रेचे नियोजन केले आहे.राज्यभर यात्रा फिरली असून मोठा प्रतिसाद लाभला आहे. सरकार विरोधातल्या या लढ्याला जत तालुक्यातील जनतेनी साथ द्यावी, 4 एप्रिलच्या हल्लाबोल यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुरेशराव शिंदे सरकार यांनी आंवढी येथील बैठकीत केले.आंवढीतील बैठकीला मोठा प्रतिसाद लाभला.
जत : हल्लाबोल यात्रा तयारीसाठी
राष्ट्रवादीकडून आंवढी येथे बैठक घेण्यात आली