जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील शेतकरी व आडत व्यापारी यांच्या आडचणी सोडवून जत बाजार समिती सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही नूतन सभापती देयगोंडा बसवंत बिरादार यांनी दिली.
जत येथील श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार समितीच्या सभापती पदावर देयगोंडा बिरादार यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी पदभार स्विकारला.यावेळी आडत व्यापारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बिराजदार बोलत होते. बाजार समिती आवारात शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरविण्यात येत आहेत. यापुढील काळात बाजार समिती आर्थिक सक्षम करून, शेतकऱ्याना जादा दर कसा मिळेल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणून सहकार्य करावे असेही अावाहन त्यांनी यावेळी केले.
सुरवातीस बाजार समिती सहाय्यक सचिव सोमनिंग चौधरी यानी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी संचालक परमेश्वर व्हनमराठे,महेश चव्हाण,यल्लाप्पा तोडकर, फिरोज खतिब,प्रकाश शिंदे,विश्वास शिंदे,ज्ञानू माने,सुरेश यादव खंडेराव जाधव,रामाण्णा बेळुंखी,संजय पट्टणशेट्टी,शिवकुमार बेळुंखी आदी मान्यवर उपस्थित होते.
जत : जत दुय्यम आवाराच्या सभापती निवड झाल्याबद्दल देंयगोडा बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला.