माडग्याळ |व्हसपेठ-आंसगी रस्त्याच्या दर्जाहीन कामामुळे गाडी घसरली : मोठा अपघात टळला | www.sankettimes.com

0

माडग्याळ, वार्ताहर : व्हसपेठ ते आंसगी या नव्याने काम चालू असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे.जत बांधकाम विभागाचे सुस्त अधिकारी कार्यालयाबाहेर पडत नसल्याने यासह पुर्व भागातील सर्वच रस्त्याची अशी आवस्था झाली आहे.याला निव्वळ बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अर्थपुर्ण संबध कारणीभूत आहेत.अशा कामामुळे गत वर्षी झालेले पुर्व भागातील रस्ते खड्डेयुक्त बनले आहेत.हेही काम तशाच पध्दतीने सुरू आहे.याच मार्गावरून जाणारी एक चारचाकी गाडी साईट देताना साईच पट्ट्यात दबल्याने रस्तावरून घसरली,चालकांने प्रसंगावधान राखत गाडी थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.त्यामुळे याकडे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी पाहणी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

नवा होणाऱ्या या रस्त्यावर खड्डी व मजबूतीकरण व्यवस्थित झाले नाही,साईट पट्ट्यात मुरमाऐवजी माती भरल्याचे चित्र आहे.त्यामुळे बाजू देताना वाहने मातीत दबून रस्ता अपघात प्रणव क्षेत्र बनत आहे.संखपासून जतला जोडणारा हा प्रमुख रोड आहे.मुळात कित्येक वर्षानंतर या मार्गाचे काम सुरू झाले आहे.तेही निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने वर्षभरात खड्डे पडण्याची चिन्हे आहेत. रस्त्याच्या खड्डीकरण,साईटपट्टया,रोलिंग नियमबाह्य आहे.डांबरतर शासनाचे कोणतेही मानकंण पुर्ण करत नसल्याचे दिसते. इतका होताना संबधित अधिकारी झोपेचे सोंग घेऊन आहेत हे विशेष.

Rate Card

व्हसपेठ-माडग्याळ रस्त्याच्या दर्जाहीन कामामुळे चारचाकी गाडी घसल्याने पलटी होताहोता वाचल्याने मोठा अपघात टळला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.