शेगाव | आर्थिक व्यवहारातील भांडणामधून सागर बोराडेचा नाहक बळी | www.sankettimes.com

0

शेगाव मधील घटनेने अनेक प्रश्न उपस्थित ; पोलिस, सतर्क नागरिकांमुळे गतीने खूनाचा उलघडा

जत,प्रतिनिधी : शेगाव ता.जत येथील सागर शहाजी बोराडे यांचा मंगळवारी सध्याकांळी जत-आंवढी रस्त्यावर झालेला अपघात हा बनाव असून आर्थिक व्यवहारातून सागरचा खून केल्याचे उघडकीस आले. आर्थिक वादातून एका उमद्या तरूणाचा नाहक बळी गेला. 

Rate Card

मुख्य व अन्य एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी शनिवारी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना दहा दिवस पोलिस कोठडी सुनावली. 

लोहगाव येथील ठेकेदार उमेश काशिद यांचा मेहूणा रोहित भोसले यांने सिमेंटच्या ट्रकने धडक देत सागरचा खून केला आहे, त्याप्रकरणी उमेश काशिद, रोहित भोसले, राहूल भोसले व अन्य एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. तपास अजून बाकी असल्याने व अजून काही आरोपी असण्याची शक्यता तपासली जाणार आहे. संपुर्ण प्रकरणाच्या मुळापर्यत आम्ही लवकरच पोहचू असे तपास अधिकारी राजू तासिलदार यांनी सांगितले.

मयत सागर बोराडेच्या घर कामाचा ठेका घेतलेला ठेकेदार उमेश काशिद यांने काम व्यवस्थित न केल्याने सागर यांने काशिदचा ठेका काढून घेतला होता. काशिदकडे जादा गेलेले एक लाख रुपये परत करण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता. त्यातून काशिद व बोराडेच्यात वादावादी झाली होती. त्यांची खुन्नस मनात ठेवून उमेश काशिद, व त्याचे अंतराळ येथील दोन मेहुणे रोहित व राहूल यांनी अगदी थंड डोक्याने कट रचून ता.13 मार्चला आंवढी रोडवर ट्रकने धडक देत खून केला होता.राहूल काशिदच्या खुन्नससाठी मेहण्यांनी मदत केल्याचे समोर आले आहे. खून होण्याअगोदर रोहित भोसले हा चालक असलेल्या ट्रक शेगाव येथे तीन दिवस थांबवून ठेवला होता.सलग तिन दिवस सागरवर पाळत ठेवली होती. सागर कधी दुकानातून बाहेर पडतो,कुठेकुठे जातो यासाठी एकाने माहिती देण्याची जबाबदारी पेलली त्यातून मंगळवारी 13 मार्चला काशिदला संधी मिळाली. सध्याकांळी सागरने त्यांचा मित्र अनिल बोराडेला आंवढी रोडवर घराकडे दुचाकी वरून सोडण्यासाठी जात असल्याची माहिती उमेश काशिद व भोसले बंन्धूना मिळाली.त्यासरशी तयारीत असलेल्या तिघांनी सागरच्या पाठिमागे पेट्रोलपंपावर थांबलेला ट्रक लावला शेगाव पासून काही अंतरावर दुचाकींस पाठीमागून जोरदार धडक दिली.राग इतका होता की सागरची दुचाकी सुमारे दोनशे मीटर फरफडत नेहली होती.सागरचा मित्र अनिल बोराडे पहिल्या धडकेत उडून जाऊन रस्त्याकडेला पडल्याने वाचला आहे.मात्र त्यांची प्रकृत्ती अजूनही गंभीर आहे.त्याला अद्याप बोलताही येत नाही.त्यांच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. ट्रकने धडक दिल्यानंतर ट्रक चालक राहूल भोसले यांने ट्रक पुण्यास पळविला. सर्वकाही नियोजनबध्द अपघातचा बनाव झाल्याने तिघे आरोपीं बिनधास्त होते.मात्र गेले तीन दिवस संशस्पाद व पेट्रोलपंपावरील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे शेगाव मधील सागरचे नातेवाईक, ठेकेदार काशिद व नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करत पुणे गाठले होते. तेथे ट्रकसह चालक राहूल भोसले मिळून आला.तेथून त्याला शेगाव येथे आणण्यात आले, तेथे काही नागरिकांनी हिसका दाखविल्याने राहूल भोसलेंनी खूनाची कबूली दिली. त्यानंतर त्याला जत पोलिसाच्या ताब्यात दिले.तत्पुर्वी जत पोलिसांनी अपघातचा पंचनामा करून प्रत्यक्ष घटनास्थळ पाहिले.घटनास्थळी ट्रकने कुठेही ब्रेक दाबल्याचे वण्र नव्हते. सागरला माेटारसायकलीसह दोनशे मीटर फरफडत नेले होते. अशा काही संशस्पाद गोष्टी आढळल्याने पोलिसांनी तसा तपास सुरू केला.दरम्यान नागरिकांनी पोलिसाकडे दिलेल्या राहूल भोसलेला पोलिसी खाक्या दाखविला, त्यांनतर खूनाचा उलघडा झाला.राहूल भोसलेचा दाजी व बांधकामाचा ठेके घेणारा काशिद यांचा सागर बोराडे बरोबरच्या वादातून काशिद,राहूल व राहूलचा भाऊ रोहित व अन्य एका अल्पवयीन आरोपीची नावे समोर आली.सागरने उमेश काशिद बरोबर केलेल्या आर्थिक व्यवहारातून झालेला वादाचा राग मनात धरून काशिदने मेहूण्यांना बरोबर घेत सागरवर पाळत ठेऊन नियोजन बंध्द अपघातचा बनाव करत खून केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.आर्थिक कारण किती विकोपाला जाऊ शकते यांचे हे उदाहरण आहे.यांच वादातून एक उमद्या युवकांला जिव गमवावा लागलाय,तर रागाच्या भरात केलेल्या कृत्यामुळे तिंघांना जेलमध्ये जावे लागले आहे. किरकोळ घटनेतून तयार झालेली विकृत्ती काहीही करू शकते,त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगणे क्रमप्राप्त आहे.असाही शेगाव घटनेतून बोध निघतो.

निर्दयपणे सागर बोराडेचा खून केल्यानंतर आता अपघात बनाव निश्चित झाल्याने व तशी  पोलिसात नोंद झाल्याने बिनधास्त असलेला ठेकेदार उमेश काशिद हा सागरच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहिला होता.तसेच ट्रकला शोधण्यासाठी नातेवाईकाबरोबर पुणे येथे गेला होता.त्यादरम्यान झालेल्या संभाषणात सागरचे कुटुंबिय व सोबतच्या नागरिकांना राहूल काशिदने वेगवेगळी माहिती दिल्याने त्यांच्याविषयी शंका आल्याने त्यालाही नागरिकांनी बोलते केल्याची घटनास्थळी चर्चा होती.त्यामुळे सर्व प्रकार उघडीस येण्यास मदत झाली.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.