जत | विजेचा भार कमी करण्यासाठी 100 केव्हीचे ट्रान्सफॉर्मर बसवा |आ. विलासराव जगताप |www.sankettimes.com

0

तालुक्यातील विजेचा भार कमी करण्यासाठी 100 केव्हीएचे ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील वाढता विजेचा भार कमी करण्यासाठी आमदार विलासराव जगताप यांनी तालुक्यातील 63 के.व्ही.ए. बदलून 100 के.व्ही.ए. चे ट्रान्सफॉर्मर बसविण्याची ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली मागणी केली.

जिल्ह्यात सर्वात मोठ्या असणाऱ्या जत तालुक्यात विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. 63 के.व्ही.ए. कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर असल्याने वारंवार ट्रान्सफॉर्मर जळत होते. यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यासाठी जत तालुक्यातील 63 के.व्ही.ए. बदलून 100 के.व्ही.ए. चे ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी आमदार विलासराव जगताप यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्याकडे केली आहे. 

Rate Card

पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड वाहनांमुळे तालुक्यातील रस्ते खराब अवस्थेत होते. सदर रस्त्यांची सुधारणा करण्याच्या मागणीचे पत्रही उर्जामंत्री बावऩकुळे यांच्या कडे आमदार जगताप यांनी केली आहे.यात पवनऊर्जा प्रकल्पामुळे खराब झालेले अचकनहळ्ळी ते सिध्देश्वर मंदिर ग्रा.मा.201 ची दुरुस्ती करणे (51 लाख), निगडी खु. ते अचकनहळ्ळी ग्रा.मा.191 ची दुरुस्ती करणे (99.99 लाख), प्रजीमा 67 ते तांबे वस्ती रस्ता ग्रा.मा. 331 ची दुरुस्ती करणे (47.99 लाख), राज्य मार्ग 155 (व्ह्सपेठ) ते जाधववस्ती ग्रा.मा.148 ची दुरुस्ती करणे (40 लाख), राज्य मार्ग 155 ते वाषण कंठी बागेवाडी ते प्रजिमा.65 ची दुरुस्ती करणे (14 लाख), राज्य मार्ग 136 ते पाच्छापूर ग्रा.मा. 27 ची दुरुस्ती करणे (75 लाख), बेळूंखी ते वाषण ग्रा.मा. 316 ची दुरुस्ती करणे (162 लाख), उमराणी सिंदूर बेरडहटटी ग्रा.मा. 195 ची दुरुस्ती करणे (130 लाख), या रस्त्यांचा समावेश आहे. यासाठी एकूण 6 कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर करुन जत तालुक्यातील रस्ते मजबूत करावे अशी मागणी आमदार जगताप यांनी ऊर्जामंञ्याकडे केली आहे.

त्याचबरोबर तालुक्यामध्ये बसर्गी, उटगी, वाळेखींडी, अंकले एकूण चार सबस्टेशन मंजूर होते त्यापैकी बसर्गी, उटगी, वाळेखींडी, तीन सबस्टेशन सुरु झाली आहेत. अंकले येथील सबस्टेशनचे काम जागेच्या अडचणीमुळे राहिले होते. अंकले येथील सबस्टेशनचे काम लवकर मार्गी लावावे अशी मागणीही आमदार जगताप यांनी पत्राद्वारे केली आहे. सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी उर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावन्नकुळे सबंधित विभागास आदेश दिले आहेत. सर्व कामे लवकरच पूर्ण होतील.

जत तालुक्यातील 63 केव्हीचे बदलून 100 केव्हीएचे ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी आ.विलासराव जगताप यांनी ऊर्जामंञ्याकडे केली.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.