चित्रपट ” व्हाटस अप लग्न ” प्रामाणिक प्रयत्न ,,

0


चित्रपट ” व्हाटस अप लग्न ” प्रामाणिक प्रयत्न ,,

लग्न हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतोप्रत्येकाला लग्न व्हावे असे वाटत असते त्यापेक्षा घरच्या मंडळीना आणि आपल्या नातेवाईकांना त्याची उत्सुकता अधिक असते हा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतोचकोणाचे लग्न कसेआणि कोणाबरोबर जुळेल हे सांगता येणे कठीण आहेलग्न म्हंटले कि मग मुलीकडची मंडळी वधूवर सूचक संस्थेमध्ये नाव नोंदणी सुरु करतातआजकाल सगळे कसे ऑन लाईन झालेलं आहेह्या आजच्या वास्तववादी युगात कोणाचे व्हाटस अप लग्न जुळले तर आश्चर्य मानायला नकोअशीच मध्यवर्ती कल्पना घेऊन ” व्हाटस अप लग्न ” ची निर्मिती फिनक्राफट मिडिया एंड एन्टरटेनमेंट प्रालीया चित्रपट संस्थेने केली आहेप्रस्तुती जाई जोशी आणि व्हिदिओ पैलेस ने केली असून निर्माता दिग्दर्शक विश्वास जोशी हे आहेतकथा अभिराम भडकमकरविश्वास जोशी यांची तर पटकथा – संवाद मिताली जोशीअश्विनी शेंडेविश्वास जोशी यांनी लिहले आहेतछायाचित्रण सेतू श्रीराम यांचे असून अश्विनी शेंडे क्षितीज पटवर्धन यांच्या गीतांना निलेश मोहरीरट्रोय आरीफ यांनी संगीत दिले आहे.

या मध्ये वैभव तत्ववादीप्रार्थना बेहरेविक्रम गोखलेवंदना गुप्तेविध्याधर जोशीइला भाटेस्नेह रायकरअश्विनी कुलकर्णीविनी जगतापसविता मालपेकरसुनील बर्वे या कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे.

आकाश प्रधान वैभव तत्ववादी हा एका मोठया नामवंत आयटी कंपनी मध्ये नोकरीला असतोआपले काम प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने करणे इतकेच त्याला माहित असतेआकाश हा एकदम टापटीप व्यवस्थित रहात असतोजी वस्तू ज्या जागी असेल त्याच जागी ती दिसायला आणि असायला हवी हा त्याचा कटाक्ष असतोएकटाच रहात असल्याने चहा कॉफी करताना सुद्धा सगळ्याचे प्रमाण ठरलेलं मोजूनमापून करीत असतोएक दिवस त्याला ऑफिसच्या कामा निमित्ताने नाशिक ला जावे लागते कंपनीने बुक केलेल्या गाडीमध्ये अश्विनी { प्रार्थना बेहरे }  नावाची मुलगी येऊन बसते ती एक कलाकार आहे,, तिला सुद्धा नाशिकला जायचे असतेहि अश्विनी टापटीप – व्यवस्थित कधीच नसतेआई वडिलांची एकुलती एक असल्याने लाडात वाढलेली असतेघरकाम तिला कधीच येत नाही,गाडीत गाणी ऐकण्यासाठी ती ड्रायव्हर ला पेन ड्राईव्ह देतेअश्विनीचे घर आल्यावर ती उतरून घरी जाते आणि आकाश आपल्या ऑफिसला निघून जातोघरी आल्यावर अश्विनीला आठवते कि आपला पेन ड्राईव्ह गाडीमध्ये विसरलो आणि त्यामुळे ती आकाश ला फोन करून भेटायचे ठरवितेआणि दोघे भेटतात,

अश्विनीची रेवती मावशी हि अश्विनीच्या मागे लग्न करण्याचा तगादा लावत असतेअश्विनीने आपले नाव एका वधूवर संस्थेकडे नोंदविलेल असते त्याच ठिकाणी आकाशच्या आईने आकाश चे नाव नोंदविलेल असते अश्विनीच्या पाहण्यात तो येतो आणि ती सहज त्याला होकार कळवून टाकतेदोघे पुन्हा एकत्र येतातकालांतराने त्यांचे रजिस्टर पद्धतीने लग्न होतेत्याचवेळी अश्विनीला एका डेलीसोप मध्ये काम करण्याची संधी मिळतेआकाश हा आपल्या ऑफिसच्या कामात बिझी होतो अश्विनी डेलीसोप मध्ये काम करतेदोघांची कामे वेगवेगळ्या वेळी असतातदोघेही ठरवतात कि आपण आपले करिअर जपायचेकामाला महत्व द्यायचे त्यामुळे त्यांच्यामध्ये मेळ बसायला अडचण येतेत्यांचे संभाषण हे ” व्हाटस अप ” वर सुरु होतेएकमेकाशी गप्पा नाहीतकित्येक दिवसात दोघांनी एकमेकांना जागे असलेलं बघितलं नाहीएकमेकाला वेळ न दिल्याने त्यांच्यातील ताण तणाव वाढत जातोत्या दोघांना आधुनिक तंत्रज्ञानमुळे सर्व वस्तू घरपोच येतातपण तरीही त्यांना एकमेकासाठी वेळ देण्यासाठी वेळच मिळत नाहीदोघेही एकाच घरात राहून सुद्धा स्वतंत्रपणे आयुष्य जगत असतातशेवटी नेमके काय होते ते सिनेमात समजू शकेल.

Rate Card

वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांनी आपापल्या भूमिकेतील ” प्रेमचिडचिडआपुलकीजिव्हाळाताटातूट अश्या विविध छटा उत्तमपणे सादर केल्या आहेतबाकीच्या कलाकारांची साथ उत्तम लाभली आहेकाही ठिकाणी चित्रपट संथगतीने जातो परंतु एकदा पहायला हरकत नाही.



दीनानाथ घारपुरे मनोरंजन प्रतिनिधी ९९३०११२९९७


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.