बेदाण्याने भरलेला टेम्पोसह सुमारे चोविस लाख मुद्देमाल लंपास : शेतकरी, चालक,क्लिनरचे हातपाय बांधून मारहाण
जत,प्रतिनिधी : विजापुर-गुहागर मार्गावर मुंचडी हद्दीतील पाच्छापूर ओढापात्राजवळ बुधवारी रात्री बेदाणे भरून तासगावला चाललेल्या आयशर टम्पोवर धुम स्टाईलने दरोडा घालून बेदाण्याने भरलेला टेम्पो,मोबाईल व रोकड असा 24 लाख 24 हाजार 900 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी टेम्पो अडवून तलवारीचा धाक दाखवत टेम्पोतील चालक,क्लिनर व एका शेतकऱ्यांचे हात पाय बांधून मारहाण केली.त्यांचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी पलान केले.जत तालुक्यातील मुंचडी ते जत दरम्यान असलेल्या लिंग ढाब्यापुढील ओढापात्राजवळ बुधवारी रात्री दरोड्याचा प्रकार घडला.यामध्ये चालक संगनबसू शरणाप्पा डोणूर (वय-32),महातेंश शिवाप्पा खरकबी,(वय-30),सुर्यकांत धर्माण्णा नायकवडी (वय- 35)सर्वजण राहणार चलवादी ता.सिंदगी जि.विजापूर हे तिघे जखमी झाले आहेत. चालक डोणूर यांने जत पोलिसात तक्रार दिली आहे.याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.
पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, चलवादी ता.सिंदगी जि.विजापुर येथील चार शेतकऱ्यांचा 810 बॉक्स बाजारभावाप्रमाणे त्यांची किमंत 17 लाख 10हाजार एवढी होते. बेदाणा तासगाव येथील बेदाणा स्टोरेजमध्ये ठेवण्यासाठी निघाला होता. आयसर कंपनीचा (टेम्पो क्र.केए 45,ए 3927) चा लिंग ढाब्याजवळ डायव्हर बदलण्यासाठी थांबविण्यात आला.त्यांचा फायदा घेत एक दुचाकी लिंग ढाब्यापासून पाठलाग करत होती.दरम्यान टेम्पो पाच्छापूर ओढापात्राजवळ येताच दोन दुचाकी आडव्या लावण्यात आल्याने चालकांनी टेम्पो थांबविताच दुचाकीवरील जरकीन घातलेले व कापडाने तोंड बांधलेल्या सातजणांच्या टोळीने टेम्पोतील चालकसह तिंघांना खाली खेचत मारहाण करत त्यांच्याकडील तीन मोबाईल, रोक रक्कम 1900 रुपये काढून घेतले.तसेच ओढत नेहत
लगतच्या शेतात पुन्हा मारहाण करून हातपाय दोरीने बांधून टाकून देण्यात आले.मुद्देमाल सह टम्पो विजापूरच्या दिशेने पळविला .दरम्यान बांधलेल्यांनी सुटका करत रस्त्यावर आले असताना हा प्रकार उघडीस आला.दरम्यान राजोबावाडीतील दरोड्याचे प्रमाणे हाही दरोडा असल्याने व त्यातील अारोपी सात ते आठ व अंगात थंडीतील जरकीन, तोंड बांधलेले होते,यातही तशाच्या वर्णाचे आरोपीं असल्याची चर्चा होती.घटनेमुळे जतचे रस्ते असुरक्षीत बनल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी सतर्कता दाखवावी अशी मागणी होत आहे.
फोटो
जत-विजापूर महामार्गावरील दरोड्यातील जखमी शेतकरी, चालक व क्लिनर





