शेगाव | अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मुत्यू | www.sankettimes.com

0
2

शेगाव -आंवढी रस्त्यावरील घटना : दुचाकीला पाठीमागून धडक, एक जखमी

जत, प्रतिनिधी :शेगाव (ता.जत) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सागर शहाजी बोराडे (वय-23) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर अनिल शंकर बोराडे (वय-36) हे जखमी झाले. याबाबत विजयकुमार धोंडीराम बोराडे यांनी जत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.ही दुर्घटना  मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.मयत सागर बोराडे यांचे शेगाव बसस्थानकाजवळ मोबाईल शॉपीचे दुकान आहे. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अनिल बोराडे यांनी सागर यास घरी सोडण्याची विनंती केली. अनिल यांचे घर  शेगावपासून दीड कि.मी. अंतरावर शेगाव -आवंढी रोडलगत आहे.सागर त्याच्या यामाहा कंपनीच्या (एमएच 11,एएक्स 9077) दूचाकीवरून अनिल यांना घरी सोडण्यास जात असताना रात्री साडेदहाच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत सागर हे जागीच ठार झाला,तर अनिल उडून बाजूला पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.धडक इतकी भिषण होती की,अज्ञात वाहनाने दुचाकीस सुमारे पाचशे फूट ओढत नेल्याने मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता. पाठीमागे बसलेले अनिल बोराडे जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी जतचे  पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मयत सागर अविवाहित होता. मनमिळाऊ स्वभाव असलेल्या तरुणाचे आकस्मित अपघाती निधन झाल्याने शेगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेगाव : शेगाव-आंवढी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीची झालेली आवस्था व मयत सागर बोराडे

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here