संख | स्वच्छ सुंदर संखसाठी ग्रामपंचायत सरसावली | www.sankettimes.com

0

संरपच मंगल पाटील यांचा पुढाकार : परिवर्तनाची नवी पहाट ला आदर्शवत करेल.

संख,वार्ताहर : संख ता.जत गाव स्वच्छ,सुंदर गाव बनविण्यासाठी नवे पदाधिकारी काम करत आहेत.अस्वच्छता,गटारी तुंबलेल्या,सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे संखमधील चित्र आता बदलत आहे.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत संत्तातर होऊन भाजपप्रणित आर.के.पाटील गटाची सत्ता आली आहे. त्यांच्या पत्नी मंगल पाटील सध्या संरपच आहेत. विकास व लोकहितासाठी काम करण्याचे आश्वासन निवडणूकीपुर्व दिले होते.त्यादृष्टीने ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. प्रांरभी गावातील स्वच्छतेला प्रांधान्य देण्यात आले आहे. गावातील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी सुरू करण्यात आली आहे. गावातील गटारीतून काढलेला,ग्रामस्थांनी टाकलेला कचरा तातडीने उचलून कचरा डेपोवर आता टाकण्यात येत आहे. गाडी नित्यांने गावातील वेगवेगळ्या भागात फिरून कचरा उचलत असल्याने संख स्वच्छ, सुंदर बनत आहेत.अप्पर तहसिल कार्यालय व भविष्यातील तालुक्याचे ठिकाण म्हणून संख समोर येत आहे.त्यापार्श्वभुमीवर विकासाच्या योजना गतीने राबवून कायापालट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Rate Card

 निवडणूकीत ग्रामस्थापुढे आम्ही विकासाचे व्हिजन घेऊन गेलो होतो,त्याला साथ देत संखकरांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरून संख तालुक्यातील आदर्श गाव करण्यासाठीच्या कामास सुरूवात झाली आहे.जनहिताला प्राधान्य देत नव्या योजना राबविण्यात येत आहे.येत्या काही दिवसात बदललेले संख दिसेल.

सौ.मंगल पाटील, संरपच संख

संख : संख गावभागातील कचरा उचलण्यासाठी नव्याने आणलेली घंटागाडी यामुळे दररोज कचरा उचलला जात आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.