उमराणी | 18 मार्चला श्री.गुरू शिवलिंगेश्वर महास्वामीजीची मुर्ती प्रतिष्ठापना |संकेत टाइम्स www.sankettimes.com

0

उमराणी, वार्ताहर : उमराणी ता.जत सुक्षेत्र श्री.गुरू शिवलिंगेश्वर महास्वामीजीची मुर्ती प्रतिष्ठापना व जत्रा महोत्सवा निमित्त बुधवार ता.14 ते 18 मार्च अखेर 9 वा वेंदात परिषद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Rate Card

या परिषदेत श्री.श.ब्र.गंगाधर शिवाचार्य स्वामीजी यांच्याहस्ते मुर्ती प्रतिष्ठापना व धार्मिक विधी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी श्री.ब्र.कृष्णानंद अवधुतरू(जमखंडी),श्री.इब्राधीम सुतार(महालिंगपूर),श्री.ब्र.माताजी सरस्वतीजी(बेंळगाव),श्री.ब्र.मातोश्री अक्कमहादेवीजी(उमराणी),श्री.गंगाधर शास्ञीजी (दरूर)हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.वेंदात परिषद निमित्त दररोज सायंकाळी 7 वाजता महात्माचे प्रवचन,व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.रविवार 18 मार्च रोजी मुर्तीची प्रतिष्ठापना,होमहवन व महारूद्राभिषेक संपन्न होणार आहे.तत्पुर्वी सकाळी पालखी उत्सव,दुपारी 12 वा.आर्शिवचन,मधामंगल व महाप्रसाद असे धार्मिक विधीचे आयोजन आहे.तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत,जास्त भाविकांनी उपस्थित राहून गुरू कृपेस पात्र व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.