संख | ऑनलाईनच्या नावाखाली पुर्व भागातील तलाठी दिड महिन्यापासून ऑफलाईन | संकेत टाइम्स | www.sankettimes.com

0

नागरिकांची कामे खोंळबली ; आठवड्यातून काही दिवसतरी तलाठी सजेच्या ठिकाणी बसवा : मागणी

संख,वार्ताहर : संख ता.जत येथील सर्कल – तलाठी गेले एक महीना पासुन अॉनलाईन कामासाठी ऑफिसला टाळा ठोकून सांगली येथे गेल्याने शेतकरी,सामान्य लोकांचे शेतीचे  7/12,खाते उतारे, उत्पन्न दाखले अशी कामे रखडली आहेत. अनेक शेतकरी या कार्यालयास धडकी मारून जात आहेत.प्रत्यक्षात अप्पर तहसिल कार्यालय झाले मात्र तलाठी नसल्याने कार्यालय बिनकामाचे ठरत आहे.तलाठी पातळीवरील कामे अडत असल्याने शेचकऱ्यांचा संयमाचा बांध सुटत आहे.तातडीने किमान आठवड्यातून काही दिवसतरी तलाठी उपस्थित रहावा अशी मागणी होत आहे.

 संखसह परिसरातील अनेक गावातील तलाठी नसल्याने कार्यालये असून अडचण नसून खोळंबा झाली आहेत.तसेच एकाच तलाठीकडे अनेक गावाचे कामकाज दिले असल्यामुळे  तलाठी कुठे असतात.हे सामान्य नागरिकांना लवकर समजत नाही. त्यामुळे त्यांच्या आडून कामे करून देतो म्हणून अनेक झिरो तलाठी सामान्य नागरिकांना लुटत असल्याचे चित्र आहे.त्यातच सातबारा ऑनलाईनच्या कामासाठी संखसह परिसरातील मंडल अधिकारी, तलाठी,कोतवाल सांगलीत आहेत. 

Rate Card

त्यामुळे दिड महिन्यापासून कामे अडली आहेत.त्यातच पुर्व भागातील गौण खजिन्याची चोरी जगजाहीर आहे.त्याला रोकण्यासाठी तलाठी नसल्याने तस्कर सुसाट आहेत.दिवसाढवळ्या अनेक गावात गौणखनिजांची तस्करी होत आहे. ते रोकण्यासाठी व सामान्य जनतेची कामे करण्यासाठी तलाठी व अन्य कर्मचाऱ्यांना आठवड्यातून काही दिवसतरी सजेच्या रहावेत अशी मागणी होत आहे.

संख :नव्याने अप्पर तहसिल कार्यालय झालेल्या संखचे मंडल व तलाठी कार्यालय दिड महिन्यापासून कुलूपबंद आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.