संख : वाळू तस्करीला आता दक्षता कमिटीची जरब | संकेत टाइम्स www.sankettimes.com

0
10

पोलिस,महसूल विभागाचे संयुक्त पाऊल : प्रत्येक गावचा संरपच अध्यक्ष :तक्रार अाल्यास कारवाई

संख,वार्ताहर : जत पुर्व भागातील भोर नदी काटावरील वाळू तस्करी रोकण्यासाठी लगतच्या 65 गावात संरपचाच्या दक्षता कमिटी स्थापन करून वाळू तस्करीच्या पायबंध घालण्यासाठी पोलिस व महसूल विभागाने प्रयत्न सुरू केलेत.त्यासाठी पुर्व भागातील 65 गावच्या संरपच पोलिस पाटील व लोकप्रतिनिधीची बैठक संख येथे संपन्न झाली.

यावेळी नायब तहसिलदार नागेश गायकवाड, सा.पोलिस निरिक्षक भगवान शिंदे प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना नागेश गायकवाड म्हणाले,पुर्व भागातील शेतकऱ्यांनी या नदीचा अपेक्षीत उपयोग करून घेतला नाही.काही बोटावर मोजण्याएवढा वाळू तस्करांच्या फायद्यासाठी वाळू तस्करी फोफावली आहे. या नदीचा पाणी साठवण क्षमता वाढीसाठी प्रयत्न गरजेचे आहेत.त्यासाठी नदीवर बंधारे बांधून परिसरातील शेतीत नंदनवन बनविता येईल.त्या धर्तीवर प्रशासन पुढाकार घेत आहेत. समुळ वाळू तस्करी रोकण्यासाठी प्रत्येक गावात दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्या कमिटीचा संरपच अध्यक्ष,तलाठी व ग्रामसेवक सचिव,तर पोलिस पाटील व कोतवाल सदस्य असतील. कमिटीने आपल्या परिसरात कुठेही वाळू तस्करी सुरू असल्यास पोलिस किंवा महसूल प्रशासनाला कळविण्यांची भुमिका बजावयाची आहे.त्याशिवाय वाळू तस्करी रोकण्यासाठी जनजागृत्ती करावयाची आहे.

निसर्गाचा ऱ्हास रोकण्यासाठी कृत्रीम वाळूचा बांधकामासाठी उपयोग करावा असे आवाहन गायकवाड यांनी शेवटी केले.

पोलिस निरिक्षक भगवान सांळुखे म्हणाले,वाळू तस्करीला पुर्ण पायबंध घालायचा आहे.त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. वाळू माफिया ते गुन्हेगारी असा आलेख परिसरातील कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहे. अनेक गावात वाळू तस्करांची दहशत आहे.शेतकरी वाळू तस्करांना अटकाव करित नाहीत.त्यामुळे आम्हाला वाळू तस्करी रोकण्यासाठी मर्यादा पडत आहेत. 65 गावे व्यापलेली नदीवर नेमकी कोठे वाळु तस्करी सुरू आहे, हे समजेपर्यत वाळू तस्कर पळून जाण्यात यशस्वी होतात. त्यामुळे या दक्षता कमिट्या यापुढे वाळू तस्करासमोर रोकण्यासाठी प्रयत्न करतील.नदी पात्रालगत कोठेही वाळू तस्करी होत असल्याची सुचना पोलिसांना द्या,पोलिस तेथे तातडीने पोहचतील,कुठेही वाळू तस्करांनी दहशत केल्यास कायद्या भाषेत करवाई करण्यात येईल असेही शेवटी पोलिस निरिक्षक शिंदे म्हणाले

यावेळी परिसरातील भिवर्गी व पांढरेवाडीत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन वाळू तस्करी बंद केल्याबद्दल भिवर्गीचे श्रीशैल चौगुले, पांढरेवाडीचे बिराप्पा तांबे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच बोर्गी येथील जळणाऱ्या घरातील गँस सिलेंडर बाहेर काढून मोठी हानी टाळणाऱ्यांचा व्यक्तीचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी शेतकरी संघटनेचे चंद्रशेखर रेबगोंड,तलाठी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जगताप, उपाध्यक्ष शंकर बागेळी, ग्रामसेवक संघटनेचे सुरेश खोत,मंडल अधिकारी रोहित पाटील, नंदकुमार बुकटे,कणसे,वंसत वाघमोडे,के.डी नरळे,आर.के.नरळे,दुष्यत पाटील, श्री हिपरकर आदी उपस्थित होते. परिसरातील 65 गावचे संरपच, पोलिस पाटील, तलाठी,ग्रामसेवक, कोतवाल व काही पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब जगताप यांनी केले.

संख : येथे आयोजित वाळू तस्करी रोकण्यासाठी आयोजित बैठकीत बोलताना नायब तहसिलदार नागेश गायकवाड, बाजूस उमदीचे पोलिस निरिक्षक भगवान शिंदे व मान्यवर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here