डफळापूर नळपाणी योजना, 80 लाखाच्या निधीस मंजूरी :महादेव पाटील

0


डफळापूर,वार्ताहर : डफळापूर गावभागाच्या पिण्याच्या पिण्यासाठी असणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम पुर्ण करण्यासाठी 80 लाख,68 हाजार 43 रुपये तिसऱ्या हप्त्याची रक्कमेला जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे योजनेचे उर्वरित काम गतीने होऊन गावात पाणी पुरवठा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांनी दिली.


Rate Card

पाटील म्हणाले,निवडणूकी अगोदर डफळापूरच्या नागरिकांना पेयजल योजनेतून पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते.त्याची पुर्तता करण्यात येत आहे. मी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे सतत पाठपुरवा करून योजनेच्या तिसऱ्या हप्त्याला मंजूरी मिळविली आहे.त्याचे पैसे लवकरच पाणीपुरवठा समितीकडे वर्ग होणार आहेत. या पैशातून रखडलेल्या योजनेचे पाईपलाईन फिंटिग,विजपुरवठा जोडणी,टाक्याची दुरूस्ती, व मोटारी सह किरकोळ कामे करून प्रांरभी डफळापूर आडात पाणी टाकण्यात येणार आहे.काम जवळपास पुर्णत्वाकडे आले आहे. तिसऱ्या टप्यातील काम पुर्ण करत डफळापूर गावभागाच्या आडात पाणी टाकण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासंदर्भात संबधित ठेकेदाला पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुचना दिल्या आहेत.तसेच या उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यापुढील पाणी शुध्दीकरण,वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन, गावभागातील पाईपलाईनच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत डफळापूरची पिण्याच्या पाण्याची समस्या येत्या काही महिन्यात संपवून आश्वासन पुर्ण करणार आहोत असेही यावेळी पाटील यांनी सांगितले.




Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.