चित्रपट ” भय “, इथले संपत नाही,,,

0

भयभीतीया शब्दांची ” भीती ” एकदा मनाने घेतली कि त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडून जाते. ” भित्यापाठी ब्रह्मराक्षस ” म्हणतात तशी स्थिती होतेत्यामुळे बारीकसारीक गोष्टीमध्ये त्याला भीती वाटू लागतेअश्याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित निर्माते सचिन कटारनवरे यांनी ” भय ” चित्रपटाची निर्मिती ५ जी इंटरनॅशनल या चित्रसंस्थे तर्फे केली असून सहनिर्माते अनिल साबळे हे आहेतकथापटकथासंवाद नितीन सुपेकर यांचे असून संकलन आणि दिगदर्शन राहुल भातणकर यांनी केलं आहेसंगीत विक्रम मॉन्टरोज यांचे असून छायाचित्रण राजेश राठोरे यांचे आहेह्या मध्ये अभिजित खांडकेकर,स्मिता गोंदकरसतीश राजवाडेउदय टिकेकरनिनित शर्माशेखर शुक्लासिद्धार्थ बोडकेसंस्कृती बालगुडेधनंजय मांद्रेकरनुपूर दुधवडकरदीप्ती प्रकाशअनघा जोशीमीनल सिन्हाअसे अनेक कलाकार असून प्रत्येकानी आपापल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे.

हि कथा आहे गोकुळ जोशी आणि मीरा जोशी या मध्यवर्ती कुटुंबाचीगोकुळ आणि मीरा हे सर्वसामान्य जोडपेआपले काम बरे कि आपण बरे असे त्यांचे जीवनमान आहेअसे असलेतरी गोकुळ हा एका विचित्र मानसिक रोगाने पछाडलेला असून त्याला आजूबाजूची परिस्थितीगुंडगिरीदहशदवादभ्रष्टाचार यांची त्याला कमालीची भीती वाटत असतेत्यामुळे तो आयुष्यात काहीच करण्याच्या मनस्थितीत नसतो.त्याच्या मनांत एका विचित्र भीतीने घर केल्याने तो सदैव भयभीत अवस्थेत वावरत असतोतो गिझर लावायला घाबरतो कारण त्याला शॉक लागेल अशी भीती असतेबुटामध्ये सापविंचू आहेत असे वाटत असतेट्रेनला अपघात होईल म्हणून तो ट्रेन ने प्रवास करीत नाहीह्या त्याच्या वागण्याने त्याची बायको मीरा हि खूप त्रासलेली असून तिला दिवस गेलेले असल्याने तिला आपल्या होणाऱ्या बाळाची सुद्धा काळजी वाटत असतेती डॉक्टरांना भेटते आणि गोकुळ ला नक्की काय झाले आहे हे जाणून घेतेडॉक्टर सांगतात कि गोकुळ हा ” फिझोफेनिया ” ह्या आजाराने ग्रासलेला असून त्याला मागील काही घटना सतत दिसतातत्यामुळे तो अधिक भयग्रस्थ होतोमागे घडलेल्या गोष्टी आठवल्या कि तो अधिक घाबरतो त्यामुळे तो स्वतःला सुरक्षित समजत नाही.

एक दिवस त्याच्या समोर शहरातील सुप्रसिद्ध बिल्डर ह्यांची हत्या कुप्रसिद्ध गुंड भरत टांगे यांनी केलेली असतेत्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार गोकुळ असतोत्या घटने पासून तो स्वतःला सुरक्षित नाही असे समजायला लागतोकोणीतरी आपल्या विरोधात षडयंत्र रचित आहे असे त्याला सतत वाटू लागतेतो सर्वांच्याकडे संशयाने पाहायला लागतोआणि एक दिवस त्या बिल्डरच्या खुनाच्या शोधात असलेले इन्स्पेक्टर त्याच्या घरी येताततो कमालीचा घाबरतोत्याच्या हातून भयंकर चुका होतातगोकुळच्या भित्रेपणामुळे मीराला घरीच अपघात होतोतिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले जातेआणि त्याच्या शेवट काय होतो हे तुम्ही सिनेमात पहामीरा जोशी बरी होते का गोकुळ त्याच्या आजारातून मुक्त होतो का त्या बिल्डरचा खुनी सापडतो का अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे सिनेमात दडलेली आहेत,

अभिजित खांडकेकर यांनी गोकुळ ची भूमिका रंगवली असून त्यामधील बारकावे दाखवले आहेतस्मिता गोंदकर हिने मीरा ची भूमिका मनापासून साकारलेली आहेसोबत उदय टिकेकरसतीश राजवाडे,विनीत शर्मासंस्कृती बालगुडेनुपूर दुधवाडकरशेखर शुक्लासिद्धार्थ बोडकेयांनी साथ दिलेली आहेकथाकल्पना चांगली असून ती पटकथेमध्ये मांडताना गोंधळ उडालेला जाणवतोपटकथा करताना अधिक मेहनत घेणे जरुरीचे होते असे जाणवतेसुरवातीला सिनेमा पकड घेत नाही पण नंतर गती आणलेली आहेसंकलन – दिगदर्शन राहुल भातणकर यांनी ठीक केले आहेएकंदरीत सिनेमा ठीक आहेशेवटी प्रेक्षकच ठरवतील.

Rate Cardदीनानाथ घारपुरे मनोरंजन प्रतिनिधी ९९३०११२९९७

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.