आता युध्द अटळ म्हणत स्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल

0

     सध्या छोटा पडदा गाजवत असलेली सचिन – स्वप्नील ची नंबर वन जोडी पुन्हा एकदा मोठ्या

पडद्यावर आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहेनुकताच लाँच झालेल्या रणांगण चित्रपटाच्या टीझरमधून आतापर्यंत सोबत असणारी ही जोडी आता एकमेकांविरोधात उभीठाकल्याचं लक्षात येतं आहेएवढंच नाही तर सचिनजींना पितासमान मानणाऱ्या स्वप्नीलने चक्क सचिनजींविरोधात युध्द पुकारलं आहेया युध्दामागची कारणं कायकोणत्या परिस्थितीने यादोघांना रणांगणात एकमेकांविरोधात उभं केलं आहेआणि या रणांगणात विजयी कोण ठरणार… या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं हळूहळू उलगडत जातील.

     नुकताच लाँच झालेल्या टीझरमधून कैक नामी चेहरे अंधुक दिसत आहेत…. यावरूनच पुन्हा एकदा एक मल्टीस्टारर सिनेमा मराठीत येत असल्याचं आपण म्हणू शकतोया चित्रपटातस्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकरांबरोबरच सुचित्रा बांदेकरसिध्दार्थ चांदेकरआनंद इंगळे आणि इतर कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

     52 विक्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट,मिडिया सॉल्यूशन्स   (जीसिम्स्आणि  हार्वे  फिल्म्स  निर्मित रणांगण या चित्रपटाच्या निर्मितीचं शिवधनुष्य करिष्मा जैनआणि जॉय रंजन यांनी पेललं आहेतर अर्जुन सिंह बर्रनस्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहेतर या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक राकेशसारंग यांनी केले आहे.

Rate Card

     गुरू ठाकूर आणि समीर सामंत लिखित चित्रपटाला साजेशी गाणी अवधूत गुप्तेराहुल रानडेशशांक पवार यांनी संगीतबध्द केली आहेत तर स्वप्नील बांदोडकरअवधूत गुप्तेआनंदी जोशीआणि वैशाली माडे यांनी या गीतांना आपल्या स्वरांनी रंग भरले आहेत.

      या कलियुगात बापमुलाला एकमेकांविरोधात उभं करणारा रणांगण हा चित्रपट येत्या 11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.