डॉ. कदम परखड पण निर्मळ मनाचा नेता आमदार विलासराव जगताप;जतमध्ये श्रध्दांजली सभा

0

जत,प्रतिनिधी :डॉ. पतंगराव कदम हे परखड विचारांचे असले तरी मनाने अत्यंत अतिशय निर्मळ व स्वच्छ होते. 

त्यांनी भारती 

Rate Card

विद्यापीठच्या माध्यमातून केवळ आदर्श इमारतीच उभारल्या नाहीत तर आदर्श शिक्षण व्यवस्था निर्माण केली. सांगली जिल्ह्याचे नाव देशातील शिक्षण, सहकार क्षेत्राच्या इतिहासात अजमाअमर केले, अशी भावपूर्ण श्रध्दांजली आमदार विलासराव जगताप यांनी वाहिली.येथील पंचायत समिती सभागृहात दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांना श्रध्दांज़ली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रविंद्र अरळी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख बाबूराव दूधाळ, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, आरपीआयचे पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे,बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. एम. के. पुजारी, नगरसेवक उमेंश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार जगताप म्हणाले, राजकारणात एक वेगळी उंची गाठलेला नेता म्हणून डॉ. कदम यांच्याकडे आम्ही पहात होतो. आमच्यात काही वैचारिक मतभेद होते.मात्र ते फार मोठ्या मनाचे होते. आम्ही एकत्र आलो की, सर्व विसरून जात होतो. विधीमंडळात आमच्या दोघांच्या सह्या एकाच मस्टरवर होत्या. त्यावेळी आमची गाठभेट व चर्चा व्हायची.आमच्यातील मतभेद संपविण्याचा आम्ही दोघांनीही निर्णय घेतला होता. आम्ही त्यासाठी एकत्र बसणार होतो. मात्र आमची ती बैठक झाली नाही, यांची मनात खंत राहून गेली. त्यांच्यै निधनाने सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची खूप मोठी हानी झाली आहे. राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता होती. शिक्षण, सहकार, राजकारण याक्षेत्रात त्यांनी वेगळे विश्‍व निर्माण केले आहे. त्यांनी जत तालुक्याच्या वतीन भावपूर्ण श्रध्दांजली.डॉ. अरळी म्हणाले, ज्या वयात शिक्षण घ्यावे, यांची जाणीव नसते, अशा वयात विद्यापीठाची स्थापना करणारे डॉ. कदम म्हणजे स्वत:च एक विद्यापीठ होते. प्रचंड ऊर्जा असलेला, अत्यंत दूरदर्शी व कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन काम करणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. त्यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून सांगलीचे नाव जगभर पोहोचविले.

जत: माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांना श्रध्दांजली वाहताना आमदार विलासराव जगताप, सोबत डॉ. रविंद्र अरळी, सरदार पाटील, संजय कांबळे आदी.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.