कॉग्रेस नेते रविंद्र सांवत हल्ला प्रकरण: 5 आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडी

0

जत,प्रतिनिधी:पंचायत समिती सदस्य रवींद्र तानाजी सावंत (37) व त्यांचा मित्र हणमंत सावंत (35) रा.बनाळी याना राजकीय वादातून व पूर्व वैमनस्यातून तलवार,लोखंडी गज व काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून सात पैकी पाच संशयित आरोपींना शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Rate Card

6 मार्च रोजी रात्री साडेआकरा वाजण्याच्या सुमारास बनाळी(ता.जत)गावाजवळ मारहाणीची घटना घडली होती. याप्रकरणी रवींद्र सावंत यानी सुनील जगन्नाथ जाधव वय (45) , मिलिंद शिवाजी पाटील (30) , सचिन ब्रम्हदेव जगताप (25), संतोष ब्रम्हदेव जगताप (27),स्वप्नील मारुती सावंत (28) ,  अविनाश आप्पासाहेब सावंत (23),सुदर्शन काशिनाथ सावंत (24) सर्व रा.बनाळी (ता.जत) या सात जणांच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यापैकी सुनील जाधव व स्वप्नील सावंत हे पसार झाले आहेत. इतर पाच जणांना अटक करून जत न्यायालयात उभे केले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार करत आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.