वाळू तस्करांच्या तलवारीसह मुसक्या आवळल्या उमदी पोलीसांची धाडशी कारवाई जीप व ट्रॅक्टर जप्त

0

उमदी,वार्ताहर:

       पांढरेवाडी (ता.जत)येथे सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास वाळूने भरलेली विना क्रमांक ट्रॅक्टर व त्यामागूनच येत असलेली बोलेरो जीपसह तीन आरोपींना उमदी पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून पकडले.

Rate Card

     याबाबत उमदी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पांढरेवाडी गावचे हद्दीत विनापरवाना वाळू वाहतूक करत असलेली विनाक्रमांक ट्रॅक्टर पोलिस पथकाला दिसली.पांडोझरी ते खंडनाळ रोडवर अगदी बिनधास्तपणे ट्रॅक्टर वाळू भरून जात होती.पोलिस वाहनास बघून ट्रक्टर चालक रामा शंकर पांढरे (वय 40)हा ट्रक्टर वेगाने पळवून नेत होता व ट्रक्टर पाठोपाठ पांढऱ्या रंगाची बोलेरो जीप क्र. एमएच 08 झेड- 3246 भरधाव वेगात जात होती.पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याने संबधित पोलिस वाहनास बघून माळामाळाने धुरळा उडवत पोलीसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही वाहने व संबधित आरोपींना ताब्यात घेतले व जीपची झडती घेतली असता धारधार लोखंडी तलवार त्याची अंदाजे किम्मत सातशे रुपयेची मिळून आली .सदर ट्रक्टर, जीप, वाळू, तलवार असे एकूण 7लाख 60 हाजार 700 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी भगवान तुकाराम बुधनूर (वय 30),नामदेव लक्ष्मण खामगळ (वय 30,दोघेही रा.तेलसंग) व मल्हारी जयाप्पा करपे (वय-24)या सराईत गुन्हेगाराच्याही मुसक्या आवळल्या.मल्हारी करपे या सराईतावर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल असल्याचे समजते.

        वाळू तस्करांची वाळू तस्करी करणे ठीक आहे.परंतु तलवारी सारख्या घातक हत्यार जवळ बाळगणे म्हणजे अतीशोक्ती ठरणार आहे.शिवाय वाळू तस्करांचे कर्नाटकापर्यंत व्याप्ती असल्याचे देखील यातून उघड होत आहे.कर्नाटकातील नामचीन गुन्हेगाराना सोबतीला घेत महाराष्ट्रातील सीमेलगत असणाऱ्या प्रत्येक गावात आता गुन्हेगार तयार होताना दिसत आहेत.

यापूर्वी पांढरेवाडी सारख्या ठिकाणी कारवाई करण्यास पोलीस धजावत नव्हते, शिवाय येथे नामचिन गुंडांची टोळीच कार्यरत असल्याचे समजते त्यांच्यावर कारवाई करणे सपोनि भगवान शिंदे यांच्या कारकिर्दीत मानाचा तुराच असणार आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशीकांत बोराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुर्डे,यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भगवान शिंदे , हवालदार पाटील, सरगर, कुंभारे, वळसंग, आटपाडकर आदींनी केली.

दहशत असणाऱ्या पुर्व भागातील पांढरेवाडीत बेधडक चालू असलेल्या वाळू तस्करीवर छापा घालत पोलिसांनी यापुढे कारवाया कडक असतील असा एकप्रकारे गुन्हेगारी आड चालणाऱ्या अवैद्य धंदेवाल्यांना दिला आहे.

उमदी : पाडोंझरी – खंडनाळ रस्त्यावर बेधडक चालू असलेल्या वाळू तस्करीवर छापा टाकून सशस्ञ वाळू तस्करांना पोलिसांनी अटक केली.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.