रविंद्र सांवत यांच्यावरील हल्ला प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करा : अप्पाराया बिराजदार

0

जत,प्रतिनिधी:जत तालुक्यात बनाळी पं.स.समिती मधून निवडून आलेले रवींद्र तानाजी सावंत यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्या कडून अपरात्री खुनी हल्ला झाला आहे.हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई व सर्व प्रकरणाची वरिष्ठ खात्यामार्फत नि:पक्ष चौकशी करावी अशी मागणी कॉग्रेस तालुकाध्यक्ष अप्पाराया बिराजदार यांनी केली.

Rate Card

       बिराजदार पुढे म्हणाले,जत तालुक्यातील बनाळी पं.स.समिती मतदार संघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सांवत मोठ्या फरकाने पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले आहेत. रविंद्र सावंत अत्यंत कमी वयात बनाळी गावाचे सरपंच, चेअरमन,पदावर चांगले काम करून जत पं.स.समितीच्या सदस्यपदी अटीतटीच्या लढतीत विजयी झाले आहेत. सध्या ते कॉग्रेसचे गटनेता म्हणून पंचायत समितीत अत्यंत आक्रमक विषय मांडतात.  रोजगार हमीच्या भ्रष्टाचारी सोनेरी टोळीला उघड विरोध करून चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.त्यांचा राग मनात धरून सांवत यांना कायमचे संपवण्याच्या उद्देशाने भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपरात्री सांवत यांच्यावर भ्याड खुनी हल्ला केला आहे. याची चौकशी वरिष्ठ यंत्रणे मार्फत व्हावी,कारण स्थानिक आमदार व पं.स.सभापती यांच्या दबावामुळे चौकशीसाठी पोलिसावर दबाव आणण्याची प्रक्रिया चालू आहे.चौकशीत अन्याय झाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा बिराजदार यांनी दिला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.