उमदी,वार्ताहर:पारधीतांडा (सुसलाद) शनिवारी पहाटे राजोबावाडी येथे पडलेल्या दरोडा प्रकरणी संशयित आरोपीना पकडण्यासाठी छापामारी करत असलेल्या उमदी पोलिसांच्या पथकाला पारधीतांडा(सुरलाद) येथे भारत यंकापा चव्हाण (वय 39 वर्षे,रा.पारधी तांडा)हा गावठी दारू काढत असताना आढळूंन आला.त्या
हातभट्टीवर छापा टाकून 2 लिटर तयार गावठी हातभट्टी ताब्यात घेत, कच्चे रसायन एकूण 40 ली फोडून नाश करण्यात आले. असुन अंदाजे एकूण 1300/ रु चा प्रोव्ही माल मिळाला आहे. सहा पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली.
पारधीतांडा(सुसलाद) येथील देशी दारू अड्डा उधवस्त करताना उमदी पोलिसाचे पथक





