राजोबावाडीत सशस्ञ धाडसी दरोडा पावनेतीन लाखाचा मुद्देमाल लंपास ; घरातील तिघाचे हात-पाय बांधत गंभीर मारहाण

0

जत,प्रतिनिधी: राजोबावाडी (व्हरपेठ)येथील रामा मनगिंना ठेंबरे यांच्या घरावर  सशस्ञ धाडसी दरोडा टाकत सुमारे सात चोरट्यांनी तलवारीचा धाक दाखवून घरातील तिघाचे हात- पाय बांधत व त्यांना बेदम मारहाण करून पावणेतीन लाख रुपयचा मुद्देमाल लंपास केला.घटना शनिवारी पहाटे एकच्या आसपास घडली.याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.चोरट्यांनी रामा ढेंबरे,पत्नी सुंदराबाई व नातू सुशांत खंडू नवत्रे हे जखमी झाले आहेत.ढेंबरे यांनी हातपाय कसेबसे सोडवित शेजारच्या हा प्रकार सांगिल्यानंतर ढेंबरे दांपत्य व नातवाने जत पोलिसात फिर्याद दिली. दरम्यान जत पोलिसाकडून तातडीने छापामारी केली,श्वान पथकासही बोलविण्यात आले मात्र श्वान घराभोवतीच घुटमळेल्याने चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. 

अधिक माहिती अशी, व्हसपेठ राजोबावाडी पासून पुर्व बाजूस शेतातील घरात रामा ढेंबरे पत्नी,नातूसह राहतात.आसपास लांब अंतरावर काही घरे आहेत.ढेंबरे भाजीपाल्याचा व्यवसाय करतात.शुक्रवारी माडग्याळ येथील बाजार आटपून ढेंबरे घरी जाऊन झोपी गेले होते. उन्हाचे दिवस असल्याने दरवाजा फक्त पुढे केला होता.यांचा फायदा घेत चोरटे घरात घुसले.त्यांनी प्रथम दरवाज्याजवळ झोपलेल्या रामा ढेंबरेचे हातपाय बांधले,दुसरीकडे आतिल खोलीत झोलेल्या पत्नी सुंदराबाई व नातू सुशांत यांचेही अन्य दोघानी सुतळीने हातापाय बांधले एकाचवेळी तिघाचे हातपाय बांधल्याने हालचाल करता आली नाही.बांधलेल्या स्थितित त्यांना खोलीत ओडत नेहून मारहाण केली.तुझ्याकडे पैसे जास्त झालेत,शिवीगाळ करत दमकावत गळ्यातील अडीच तोळ्याची चेक काढून घेतली.एकाने तलवारीचा धाक दाखवून पैसे कुठे आहेत सांग नाहीत तुला संपवितो असे म्हणत पुन्हा मारहाण केली.ढेंबरे यांनी जिवाच्या भितीने म्हैश विकून तिजोरीत ठेवलेले रोख साठ हाजार रूपये,व्यापारासाठी ठेवलेले साठ हाजार, मित्र आण्णाप्पा बंडगर यांच्याकडून बोअरची मोटर दुरूस्थीसाठी घेतलेले वीस हाजार असे एकूण 1 लाख 40 हाजार रुपये चोरट्यांतील साहेब नावाच्या जाड माणसाजवळ दिल्याचे ढेंबरे यांनी सांगितले.त्यातून चोरट्याचे समाधान न झाल्याने त्यांनी साहित्य विस्कटत अन्य काही आहे का बघितले.त्यातच ढेंबरे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची चेक, बदाम,ब्रासलेट,कमरेचा करदोडा,घड्याळ व पत्नी सुंदराबाई यांचे तिजोरीत ठेवलेले दोन तोळ्याचे घंटण,सोन्याची बोरमाळ,घळ्यातील डोरले,कानातील बुगड्या,वेल,सुशांत यांच्या घळ्यातील बदाम व दोन मोबाईल,एक शेळी,दोन कोंबड्या असा सुमारे दोन लाख 71 हाजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहेत. चोरट्यांनी तलवारीचा धाक दाखवून व हातापाय बांधत धाडसी दरोडा टाकला आहे. सुमारे 7 ते 8 चोरटे तीस ते चाळीस वयोगटातील आहेत.तब्बल दोन तास चालेल्या या घटनेत चोरट्यांनी आरामात घरात शिल्लक राहिलेले मटनाचे जेवनावरही ताव मारला. घराला बाहेरून कडी घालून पलायन केले.दरम्यान नातू सुशांत यांने घसरत येऊन रामा ढेंबरे यांना हात-पाय मागे करून बांधलेले सुतळी दाताने तोडली.तोंडाने सुतळी सोडून तिघांनी कशीबशी सुटका करून घराचा एक दरवाजा तोडत बाहेर येत. शेजारी काही अंतरावर राहणाऱ्या मायाप्पा सयाप्पा ढेंबरे यांना हा प्रकार सांगिल्यानंतर घटना समोर आली. तलवार,काठ्या दाखवत जिवेमारण्याची धमकी देत चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. अचनाक घडलेल्या या प्रकारने ढेंबरे कुंटूबिय सह परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Rate Card

राजोबावाडी (व्हसपेठ) येथे शनिवारी पहाटे एकच्या सुमारास दरोडा पडलेले रामा ढेंबरे यांचे घर व विस्कटलेले साहित्य

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.