दरिबडची जि.प. मतदार संघात वर्षात 1 कोटीची विकासकामे ; सरदार पाटील

0

दरिबडची जि.प. मतदार संघात वर्षात 1 कोटीची विकासकामे 


सरदार पाटील : विविध योजनेतून कामे गतीने सुरू: चार वर्षात मतदार संघाचा चेहरामोहरा बदलू


जत,प्रतिनिधी : दरिबडची ता.जत जिल्हा परिषद मतदार संघात परिवर्तन करत भाजपचे जिल्हा परिषद सदस्यपदी मतदारांनी तरूण नेते सरदार पाटील यांना निवडून दिले होते. निवडणूकीपुर्व दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या मतदार संघात एका वर्षात विविध योजनेसाठी 1 कोटीचा निधी आणला असून ती विकासकामे गतीने सुरू आहेत,अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी दैंनिक संकेत टाइम्सशी बोलताना सांगितले. मुळात जनहिताची तळमळ असणारे सरदार पाटील यांनी विजयी होताच विकासाचे धोरण अवलंबले आहे.जनतेच्या थेट संपर्काबरोबर प्रत्येक गावातील अडचणी सोडविण्यासाठी पाटील सतत प्रयत्न करत आहेत.राज्य सरकार,खासदार,आमदार,जिल्हा परिषद,पंचायत समितीतून त्यांनी मोठ्या प्रमाणात कामे खेचून आणली आहेत.अनेक नागरिकांना दिर्घकाळ उपयोगी पडतील अशा अनेक योजनेसाठी ते प्रशासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत.

गेल्या वर्षभरात पाटील यांनी  केलेली विकास कामे व त्यासाठी आणलेला निधी ;

* दरिबडची दलिवस्ती विकास निधी-20 लाख,

*आसंगी तुर्क -10,

*आसंगी जत-7 लाख,

*कोंतेबोबलाद दलिवस्ती सुधार योजना -10लाख,

*दरिबडची पशुवैद्यकीय दवाखाना -सव्वा दोन लाख,

*पांढरेवाडी शाळा दुरूस्थी -2 लाख,

*सिध्दनाथ शाळा दुरूस्थी -2 लाख,

Rate Card

*पांढरेवाडी ते लमाणतांडा फाटा रस्ता-अडीच लाख,

*पांढरेवाडी ते खंडनाळ कुलाळवाडी रस्ता दुरूस्थी -3 

*लाख,खंडनाळ ते संख रोड रस्ता दुरूस्थी -3 लाख,

*आसंगी जत व्यायामशाळा -अडीच लाख,

*दरिबडची हायस्कूलला येणाऱ्या पांढरेवाडी, सिध्दनाथ,जाल्याळ खुर्द,दरिकोणूर,खंडनाळ येथून येणाऱ्या मुलीसाठी 48 सायकलीस मंजूरी मिळाली आहे. त्या लवकरच देण्यात येणार आहेत.

*आसंगी हायस्कूलला तिल्याळ,आसंगी, राजोबावाडी सह परिसरातून येणाऱ्या मुलीसाठी 50 सायकलीस मंजूरी मिळाली आहे. 

*दरिबडची स्मशानभूमीसाठी जनसुविधा योजनेतून- साडेचार लाख,

*कागणरी दलिवस्ती विकास -7 लाख,येथील चार मुलीसाठी सायकलीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

*तिंकोडीतील शालेय मुलीसाठी 9 सायकली,

*दरिकोणूर पाझर तलाव दुरूस्थीसाठी -6 लाख रुपयाचा निधी आणून ती कामे पुर्ण करण्यात आली आहेत. विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या दरिबडची मतदारसंघात विकासपर्व आवतरले आहे. ते पुढे 4 वर्षे कामय असणार आहे. मतदार संघातील दुर्लक्षीत गावे जिल्ह्यात आदर्शवत ठरतील यासाठी माझे काम सुरू आहे. येत्या चार वर्षात मतदार संघाच्या सर्वागिंन विकासासाठी मी कठिबंध्द अाहे.असे यावेळी सरदार पाटील यांनी सांगितले.


जनतेच्या हितासाठी प्रयत्न
माझा मतदार संघ नसतानाही येथील जनतेनी मला निवडून दिले. त्यांच्या कृत्रज्ञता म्हणून विकासपर्व आणले आहे. प्रत्येक गावातील जनतेला उपयोगी योजना आम्ही राबवित आहोत. यापुढे विकास आराखडा करून लोकहिताचा प्रयत्न करू 

सरदार पाटील, जिल्हा परिषद सदस्य, दरिबडची गट

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.