टोणेवाडीत घर जळून 2 लाखाचे नुकसान

येळवी,वार्ताहर : जत तालुक्यातील टोणेवाडी गावात शुक्रवारी रात्री अचानक आग लागल्याने श्रीहरी दत्तात्रय कदम (रा-टोणेवाडी)यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले. यात सुमारे 2 लाखाचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, टोणेवाडी ते येळवी हद्द जवळ असलेले कदम कुटुंब त्यांच्या शेतातच छप्पर वजा घरात राहतात. शुक्रवारी रात्री अचानक घराला आग लागली. त्यात सर्व संसार उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले, 5 पोती बाजरी, वीस हजार रोख रक्कम,सोने-चांदीचे दागिणे असे एकूण अंदाज 2लाख नुकसान झाले आहे. गावकामगार तलाठी राहुल कोळी यांनी पंचनामा केला आहे.सुदैवाने कोणतीही जिवीत हानी टळली.जळीतग्रस्त सामाजिक संघटनाने सामाजिक बांधिलकी राखत कदम कुटूंबियांना मदत करावी अशी मागणी होत आहे.
टोणेवाडीतील श्रीहरी दत्तात्रय कदम यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले.
अटैचमेंट क्षेत्र