वाळू चोरी प्रकरणातील फरारी संशयिताना अटक उमदी पोलिसांची हळ्ळीमध्ये कारवाई

0

उमदी,वार्ताहर:

        बोर नदीतील वाळू चोरी प्रकरणी उमदी पोलिसात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला दीड महिन्यापासून फरार  संशयित आरोपींना बुधवारी हळ्ळी येथे अटक उमदी पोलिसांनी अटक केली.

Rate Card

  अधिक माहिती अशी,दीड महिन्यापूर्वी हळ्ळी (ता-जत) येथील बोर नदीत रात्री चोरट्या वाळू वाहतूक सहा पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी कारवाई केली होती. मात्र त्यावेळी संशयित आरोपीनीं ट्रॉली सोडून ट्रॅक्टर पळवून नेहला होता. याप्रकरणी उमदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आटपाडकर यांनी प्रल्हाद सिध्दाप्पा केरूर (वय 25),राघवेंद्र निंगोंडा मुलीमनी (वय 25,दोघे रा-हळ्ळी)यांना अटक केली. याकाळात ते विजयपुर येथे आश्रय घेत असल्याची माहिती समोर आली होती, मात्र बुधवारी ते दोघे हळ्ळी गावी येणार असल्याची माहीती उमदी पोलिसांना खबऱ्याद्वारे मिळाली,त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीना अटक केली. या कारवाईत सपोनि भगवान शिंदे,उपनिरीक्षक प्रविण सपांगे,आटपाडकर आदी सहभागी होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.