उमदी,वार्ताहर:उमदी (ता-जत)येथील ग्रा.पं.सदस्य हणमंत नाटीकर यांचे बंधु लकाप्पा तुकाराम नाटीकर यांच्या घराला बुधवारी रात्री अचानक आग लागून दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की उमदी-चडचण रस्त्याला नाटीकर कुटुंबियांचे शेत आहे.त्या शेतातच छप्पर वजा घरात राहतात.बुधवारी रात्री अचानक घराला आग लागली, त्यात सर्व संसारउपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले.त्यात पाच तोळे सोने, रोख रक्कम वीस हजार व धान्याची पोती असे अंदाजे दोन लाख नऊ हजार दोनशे इतक्या रकमेचा नुकसान झाले आहे.गावकामगार तलाठी यांनी पंचनामा केला.दरम्यान जळीत ग्रस्त कुंटूबियांना पंचायत समिती सदस्या सौ.लता कुळ्ळोळी,माजी ग्रा.पं. सदस्य सुरेश कुळ्ळोळी यांनी सामाजिक बांधिलकी जपत संसार उपयोगी साहित्य,1-1पोती, ज्वारी,गहु, साहित्य देऊन मदत केली. तसेच माजी ग्रा.प.सदस्य निवर्ती शिंदे यांना पाच हजार,मल्लू सालुटगी पाच हजार असे रोख स्वरुपात मदत करून नाटीकर कुंटूबियांना मदत केली.यावेळी युवा नेते संतोष अरकेरी,ज्योतिबा शेवाळे,महावीर अजमाने,शिवलिंग ममदापुरे, चिदानंद राजगंळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.याचबरोबर जळीत कुटुंबाला आधार देण्यासाठी गावातील अनेक सामाजिक संघटनानी देखील मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन नाटीकर कुंटूबियांनी केले आहे.
उमदी: येथील लकाप्पा नाटीकर यांचे जळीतग्रस्त घर,उघड्यावर आलेल्या नाटीकर कुंटूबियांना संसारउपयोगी साहित्याची मदत करताना ग्रा.प.सदस्य सुरेश कुळ्ळोळी व मान्यवर






