प्रा.संजय ठिगळे,डॉ.चंद्रशेखर हळीगंळे,डॉ.मानाजी कदम यांना लायन्सचे पुरस्कार

0
8

जत,प्रतिनिधी :उमा चँरिटेबल ट्रस्ट व लायन्स क्लबच्या वतीने यावर्षी देण्यात येणाऱ्या कै.चन्नाप्पा मल्लाप्पा संख यांच्या स्मरणार्थ  “लायन्स सामाजिक” प्रा.संजय ठिगळे,कै.शा.मिस्ञीलाल प्रतापचंद ओसवाल यांच्या स्मरणार्थ लायन्स सेवाश्री पुरस्कार मानसोपचार तज्ञ डॉ.चंद्रशेखर हळीगंळे,कै.भागिरथी बिसलाप्पा हिट्टी यांच्या स्मरणार्थ लायन्स धन्वंतरी 

डॉ.मानाजी कदम यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे वितरण 2 ते 4 मार्च अखेर होणाऱ्या व्याख्यानमालेत वितरण होणार आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या या व्यक्तींना हे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहेत.अशी माहिती डॉ.रविंद्र आरळी यांनी दिली.उमा चँरिटेबल ट्रस्ट व लायन्स क्लब जत यांच्या संयुक्त विद्यमानाने “आरोग्य व्याख्यानमाला”शुक्रवार 2 मार्च,शनिवार 3, व रवीवार 4 मार्च या दरम्यान आयोजित केली आहे.त्यात शुक्रवार ता.2 मार्च,विषय-सामाजिक स्वास्थासाठी प्रश्न सामाजिक आरोग्याचा,प्रा.संजय ठिगळे,शनिवारी ता.3 मार्च,विषय: मानसिक स्वास्थासाठी आंनदी जगण्यासाठी,डॉ.चंद्रशेखर हाळींगळे,रविवार ता.4 मार्च,शारीरिक स्वास्थासाठी आरोग्य संरक्षण, डॉ.मानाजी कदम सर्व व्याख्याने सायंकाळी 6 वाजता होणार आहेत.या कार्यक्रामाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. आरळी यांनी केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here